

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.30जानेवारी):-शहरात व तालुक्यात आज सकाळपासूनच भावूक वातावरण पाहायला मिळाले.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व ना.अजितदादा पवार यांचे (दिनांक २८ जानेवारी बुधवार) रोजी सकाळी दुःखद निधन झाल्याचे कळताच.गंगाखेड येथील सर्व व्यापारी व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवत आपली भावना आणि शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचा प्रचार सभा सुरू असून
बुधवार रोजी सकाळी ८ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार मुंबई येथून बारामती येथे विमानाने येत होते बारामती येथे त्यांचे विमान जमिनीवर उतरत असताना अपघातग्रस्त झाले या अपघातामध्ये ना.अजितदादा पवार यांच्यासह त्यांच्यासोबतचे एक अंगरक्षक दोन वैमानिक चालक एक क्रू सदस्य यांचा जागीच मृत्यू झाला ही दुःखद बातमी संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशाला हादरवून सोडणारी होती सर्वसामान्य जनतेने एक काम करणारा नेता लोकनेता गमावला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला अध्यक्ष गमावला गंगाखेडमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही दुःख सहन न झाल्याने एकच टाहो फोडला.
आपल्या नेत्यांला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गंगाखेड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी मुख्य बाजारपेठ दिवसभर बंद ठेवली होती.कुठलाही बंदचा आदेश किंवा राजकीय आवाहन नसताना नागरिकांनी स्वतःहून घेतलेला हा निर्णय ना.अजितदादा पवार यांच्यावरील प्रेम,आदर आणि आपुलकीचे प्रतीक ठरला.शहरातील वातावरण शांत,गंभीर व अंतर्मुख करणारे होते.
ना.अजितदादा पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नाहीत, तर ग्रामीण भागातील सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे,विकासाभिमुख आणि ठाम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे लोकनेते होते शेतकरी,युवक, महिला,व्यापारी अशा सर्व घटकांशी त्यांचे नाते जिव्हाळ्याचे राहिले आहे गंगाखेड तालुक्यातील व शहरातील नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते







