Home चंद्रपूर चिमुरची घोडा यात्रा 

चिमुरची घोडा यात्रा 

203

चिमुरची घोडा यात्रा ही महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील 300-400 वर्षाहून अधिक जुनी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे. चिमूर तालुक्यातील श्रीहरी बालाजी मंदिर इथे ही यात्रा संपन्न होत असते. यात्रा ही माघ शुद्ध पंचमीला सुरु होते आणि शिवरात्री पर्यंत चालत असते.

चिमुरची घोडा यात्रा ही रात्रीचा वेळी लाकडी घोड्यावर श्रीहरी बालाजी मूर्ती विराजमान करून भव्य मिरवणूक निघत असते.जेव्हा ही मिरवणूक निघत असते तेव्हा रथ हातानी ओडून संपूर्ण चिमूर शहरातून मिरवणूक निघत असते. लोकांची अशी भावना असते कि श्रीहरी बालाजीनां बोललेला नवस येथे पूर्ण होत असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

चिमुरचा यात्रेला भाविकांची खूप गर्दी असते. यात्रेचा उत्सव साधारणपणे 15 दिवस चालत असते.घोडा यात्रा गोपाळकाला आणि नवरात्र पर्यंत समाप्ती होत असते..

✒️सूयोग सुरेश डांगे(मो:-8605592830)