Home अमरावती प्रावीण्यप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी आवश्यक- प्रा.अरुण बुंदेले 

प्रावीण्यप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी आवश्यक- प्रा.अरुण बुंदेले 

219

▪️दादा भामोदकर कृषी विद्यालयात निरोप समारंभात प्रा.बुंदेंलेंचा ‘परीक्षेला जाता जाता’ कार्यक्रम संपन्न

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.16फेब्रुवारी):-” विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाच्या आदर्श वेळापत्रकानुसार अभ्यास करावा.आदर्श उत्तरपत्रिका सोडवावी,पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातील सुटसुटितपणा शेवटच्या प्रश्नापर्यंत टिकवून ठेवावा.पेपरच्या पूर्वरात्री वस्तुंची यादी करावी,पेपरच्या दिवशी शांत चित्त ठेवावे,पेपरच्या पूर्वरात्री पाच तास झोप घ्यावी ,पाण्याची बॉटल सोबत घ्यावी. वेळेची विभागणी करून प्रश्नांच्या उत्तराचा सराव करा वा. प्रावीण्यप्राप्तीसाठी विद्यार्थांमध्ये जिद्द व चिकाटी आवश्यक आहे .” असे विचार विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी” परीक्षेला जाता जाता ” हा स्वनिर्मित कार्यक्रम सादर करताना दहावीच्या निरोप समारंभात व्यक्त केले.

       ते श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचलित दादा भामोदकर कृषी विद्यालय साऊर,जि.अमरावती येथे दि .१२ फेब्रुवारी २०२६ ला संपन्न झालेल्या दहावीच्या निरोप समारंभात ‘परीक्षेला जाता जाता’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना विचार व्यक्त करीत होते.

     निरोप समारंभ व “परीक्षेला जागा जाता” या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मा.रवींद्र जावरकर,उद्घटक व प्रमुख अतिथी साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,मा.कैलास मोहोड,सौ.बरडे मॅडम, प्रा.गवई सर ,श्री एस.पी.देशमुख सर,श्री चाफलेकर सर,सौ.गंधे मॅडम,कु. ए.बी.डाबेराव मॅडम,श्री.टाले सर होते.

         अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.

       उद्घाटक व प्रमुख अतिथी प्रा.अरुण बुंदेले यांनी दीप प्रज्वलित करून निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. व दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्यानंतर ” कॉपीमुक्त अभियान ” हे स्वरचित वऱ्हाडी काव्यगीत गाऊन प्रा.बुंदेले यांनी सर्वांची मनं जिंकली.

——

प्रा.बुंदेलेंचा,परीक्षेला जाता जाता, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण करणारा कार्यक्रम- रवींद्र जावरकर

              ” दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी जीवनातील ही पहिली अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षेत प्रत्येकाला अतिशय चांगले गुण मिळाले पाहिजे त्यासाठी तुम्ही वर्षभर जो अभ्यास केला तो उपयोगात येणार आहे आणि आज प्रा.बुंदेले सरांनी जो परीक्षेला जाता जाता कार्यक्रम सादर केला त्यामुळे तुमच्या मनात निश्चितच पुन्हा अभ्यासाची प्रेरणा निर्माण होईल यात शंका नाही.”असे विचार अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक मा.रवींद्र जावरकर यांनी व्यक्त केले.

      याप्रसंगी श्री कैलास मोहोड सर तसेच वर्ग 10 च्या पल्लवी निरगुडे ,श्रेया तंतरपाळे,श्रीकेश गावंडे,कार्तिक माहोरे आणि वर्ग नववीच्या आरुषी दाणे,अंजली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.श्री टाले सरांनी गीताचे गायन केले .

          याप्रसंगी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार केला.वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला तीन सिलिंग फॅन भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांचा परिचय प्रा.नितीन गवई यांनी करून दिला.संचलन वर्ग नववीची कु.समृद्धी मोहकर तर आभार कु.आरुषी तंतरपाळेने मानले .

     निरोप समारंभाला सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाची सांगता स्वरूची भोजनाने झाली .