Home महाराष्ट्र काश्यपी व वाहुल दोंदल यांनी अष्टाडू आखाडा (लाठी-काठी) खेळत पटकावला विभाग स्तरीय...

काश्यपी व वाहुल दोंदल यांनी अष्टाडू आखाडा (लाठी-काठी) खेळत पटकावला विभाग स्तरीय प्रथम क्रमांक..

344

✒️यवतमाळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि.25फेब्रुवारी):-येथील उज्वल नगर मध्ये राहणारे विनोद दोंदल यांची विश्वभारती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता नवव्या वर्ग मध्ये शिक्षण घेत असलेली मुलगी काश्यपी व तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असलेला मुलगा वाहुल (शुभ्रूराजे) यांनी दि.२२ फेब्रुवारी २०२६ ला यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे यवतमाळ जिल्हा अष्टे डू मर्दानी आखाडा असोसिएशन यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या आयोजित अमरावती विभागीय अष्टे डू मर्दानी आखाडा २०२५ -२६ या खेळ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून प्रत्येकी दो – दोन सुवर्णपदक आपल्या नावी केले. 

  यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात घेण्यात आलेल्या विभागीय अष्टे डू आखाडा चॅम्पियनशिप स्पर्धेत काश्यपी व वाहुल (शुभ्रूराजे) यांनी सहभाग घेतला, या खेळामध्ये काश्यपी हिले १४ वर्ष आतील ४० किलो वजन आतील गटात सिलंबम (स्टिक रोलिंग) खेळा मध्ये सुवर्णपदक तर भला संतुलन यात सुवर्णपदक आपल्या नावी केले तर वाहुल (शुभ्रूराजे) याने ९ वर्ष आतील २० किलो वजन आतील गटात दांडपट्टा खेळा मध्ये सुवर्णपदक आणि स्टिक फाईट (लाठी युद्ध) या खेळ प्रकारात सुवर्णपदक आपल्या नावी करून घेतले काश्यपी, वाहुल ने दोन-दोन असे सुवर्णपदक जिंकून विजेता असल्याचा मान मिळवला.

 काश्यपी, वाहुल विजयाचे सम्पूर्ण श्रेय वडील विनोद दोंदल, आई कीर्ती दोंदल,आजी कमळ दोंदल विशेष आभार विजयाचे शिल्पकार प्रशिक्षक प्रीतम सर सोनवणे यांचे आहे, त्याच बरोबर शिक्षण घेत असलेल्या विश्वभारती इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका दीप्ती मॅम देशमुख, शाळेचे सचिव, भरमल मॅडम वर्ग शिक्षिका प्रतिमा कांबळे, वैष्णवी शिंदे, प्रिया पाटील मॅम, क्रीडा शिक्षक अमोल जयसिंगपूर, आकाश खंदार सर, सोनू गावंडे मॅडम, हजारे सर सर्व शिक्षक वृंद इत्यादी शिक्षक वृंद वेळोवेळी मार्गदर्शन करीन सहकार्य करीत राहतात, काश्यपी, वाहुल सोबत शिवकालीन मर्दानी कलेचे अभ्यास घेणारे सर्व सवंगडी मुले-मुली सहकार्य करत असतात, काश्यपी व वाहुल याने मिळवलेल्या नाविन्यपूर्ण मिळवलेल्या यशा बद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.