

▪️भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी..अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
✒️चुन्नीलाल मोटघरे(विशेष प्रतिनिधी)मो:-9359953915
आरमोरी(दि.28फेब्रुवारी):-भाजपाशी संबंधित तुषार दामगुडे व त्याच्या गुंडांनी काॅग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याचे तुषार दामगुडे याने जाहीर समर्थन केले असून, हनुमंत पवार यांच्यासारख्या कम्युनिस्ट विचारांच्या कार्यकर्त्यांना मारण्यासाठीच मला कायदेशीर पिस्तूल परवाना मिळालेला आहे. असे अत्यंत गंभीर, चितावणीखोर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वक्तव्य त्याने केले आहे.
या मोकाट हल्लेखोर तुषार दामगुडे यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी. व त्याचा बंदुक वापराचा परवाना रद्द करावा.अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक गडचिरोली यांचे मार्फत गृहमंत्री, पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शिष्टमंडळा व्दारा निवेदन देण्यात आले.
यावेळी भाकपाचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य काॅ.डाॅ.महेश कोपूलवार, जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, तालुका सचिव काॅ. रोहिदास फुलझेले, आरमोरी तालुका सचिव काॅ. प्रकाश खोब्रागडे यांचेसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनावर योग्य कारवाई न झाल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यास बाध्य होईल याची नोंद घ्यावी.असा इशारा देण्यात आला.असे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले की,या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर सर्वत्र प्रसारित झाला असूनही राज्याचे गृहखाते आणि पोलिस प्रशासन यावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही, ही बाब अत्यंत संतापजनक व धोकादायक आहे. सरकारने अशा व्यक्तींना माणसे मारण्याचा परवाना दिला आहे काय, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
यापूर्वीही भाजपाच्या विचारसरणीने पोसलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अशाच प्रकारच्या धमक्या दिल्याने अनेकदा दिसून आले आहे, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचा कट्टर समर्थक करणी सेनेचा राजसिंग अमेरा याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहित पंचवीस खासदारांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. अशा प्रकरणांमध्ये केंद्र व राज्य सरकारे तसेच गृह खाती कठोर भूमिका घेत नसल्यामुळे अशा गुंडांचे धाडस सातत्याने वाढत आहे.
तुषार दामगुडे याने हनुमंत पवार यांच्यावर हल्ला केला व आता उघडपणे हिंसेचे समर्थन करीत असून, राजकीय मतभेदांवर गोडीबाराची भाषा करत आहे.ही बाब लोकशाही, संविधान आणि कायद्याच्या राज्यासाठी अत्यंत घातक आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या संरक्षणाखाली असे गुंड मोकाट फिरत असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आपल्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने खालील मागण्यां करित आहोत.
तुषार दामगुडे यांच्यावर तात्काळ दखलपात्र कलमांसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याला कोणताही विलंब न करता अटक करण्यात यावी,त्याचा पिस्तूल वापराचा परवाना त्वरित रद्द करण्यात यावा.यावर निवेदनावर तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यास बाध्य होईल.असा इशारा देण्यात आला आहे.







