

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.6मार्च):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ७ मार्च २०२६ दरम्यान तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय कला गुण कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन दि. ५ मार्च २०१६ रोजी स्मार्ट हॉल येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदिप नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थी विकास संचालक डॉ. चंद्रशेखर वाणी, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी सहकार्य यांचे सहकार्य लाभले.
या शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक वन संरक्षक श्री. महेंद्र पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यशाळा निरीक्षक डॉ. स्वप्निल खरे, डॉ. अजय पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, प्र. रजिस्ट्रार डी. एम. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालय व विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची व उपक्रमांची माहिती दिली.
या प्रसंगी उदघाटक प्रा. डॉ. संदिप नेरकर यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ नेहमी प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून कला गुण कौशल्य सारख्या कार्यशाळेच्या आयोजनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळते. महाविद्यालयाने यशस्वी आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी नाट्य, संगीत व नृत्याचे महत्व समजावून सांगितले व विद्यार्थ्यांना तीन दिवसात विविध कला गुण कौशल्य विकसित करण्याचे आव्हान केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन सौ. एस. बी. पाटील यांनी केले तर आभार डॉ. सौ. पी. एम. रावतोळे यांनी मानले.याप्रसंगी विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी, प्रतिनिधी उपस्थित होते.







