Home महाराष्ट्र जागतिक महिला दिनानिमित्त 14 मार्च रोजी गंगाखेड येथे संस्कृती महोत्सव

जागतिक महिला दिनानिमित्त 14 मार्च रोजी गंगाखेड येथे संस्कृती महोत्सव

143

▪️महिलांसाठी गेम्स,शॉपिंग स्टॉल व स्पेशल गिफ्ट्सची मेजवानी

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.7मार्च):-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गंगाखेड येथे महिलांच्या सन्मान, प्रोत्साहन आणि आत्मनिर्भरतेच्या उद्देशाने संस्कृती महोत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम दिनांक १४ मार्च शनिवार रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ०७ या वेळी मोरया फंक्शन हॉल,डॉक्टर लाईन,गंगाखेड येथे आयोजित करण्यात येणार असून महिलांसाठी विविध उपक्रमांची रंगतदार मेजवानी असणार आहे.या कार्यक्रमात महिलांसाठी खास गेम्स,मनोरंजनात्मक उपक्रम तसेच विविध शॉपिंग स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. फॅन्सी ज्वेलरी,फॅन्सी डिझायनर साड्या,रेडीमेड ब्लाऊज, हाऊसहोल्ड आयटम्स,किचन साहित्य,कॉस्मेटिक्स तसेच कुरड्या-पापड यांसारख्या घरगुती वस्तूंचे स्टॉल या महोत्सवात उपलब्ध राहणार आहेत.

त्यामुळे महिलांना खरेदीसोबतच आनंददायी वातावरणात वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे.कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे.पहिल्या २५ महिलांमधून १ लकी ड्रॉ विजेता, शेवटच्या २५ महिलांमधून १ विजेता,कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांमधून १ लकी ड्रॉ विजेता तसेच गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या महिलांमधून ३ विजेते निवडून त्यांना स्पेशल गिफ्ट्स देण्यात येणार आहेत.

या महोत्सवात स्टॉल लावण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी आयोजकांशी तथा ९८८१७५५८५६,८४२१०९०५७५ या नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच कार्यक्रमाची माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करून सहभाग नोंदविण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमाचे आयोजन संस्कृती कलेक्शन,गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आले असून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.