Home चंद्रपूर सहकार प्रशिक्षण केंद्राने घेतले सेवा सहकारी संस्थेचे संचालकांचे प्रशिक्षण

सहकार प्रशिक्षण केंद्राने घेतले सेवा सहकारी संस्थेचे संचालकांचे प्रशिक्षण

98

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.21मार्च):-महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे सहकारी शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपुर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नागभिड यांचे संयुक्त विद्यमाने पळसगाव (खुर्द) येथे पळसगाव (खुर्द), ओवाळा व जनकापुर सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी व संचालकांचे एक दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.

या प्रशिक्षण कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सहकार प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य भारत फलके उपस्थित होते तर यावेळी विचार मंचावर पळसगाव खुर्द सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बावनकर, ओवाळा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोहुर्ले, जनकापुर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गिरीधर बारेकर, उपाध्यक्ष यादव गायधने उपस्थित होते.

या प्रशिक्षणात उपप्राचार्य भारत फलके यांनी सहकारी संस्थेची स्वायत्ता, स्वयंमपुर्णता आणी आर्थीक सक्षमीकरणा‌द्वारे संस्थेचे बळकटीकरण करून ग्रामिण विकास व रोज़गार निर्मीती शक्य असल्याचे मत मांडले.

दरम्यान एक दिवसीय प्रशिक्षणात सहकारी कायदा तरतुदी, संचालक मंडळाची कर्तव्य व जबाबदारी, संस्थेच्या सभा व सभेचे महत्व आदि विविध विषयावर चर्चात्मक मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी व संचालक यांचे प्रश्न, शंका याबाबत फलके यांनी समाधानकारक व सकारात्मक उत्तरे दिलीत. कार्यक्रमाचे संचालन व आभार डि. एन. गुरनुले यांनी केले.