Home महाराष्ट्र महाड येथे भीमाची लेकरं ऑर्गनायझेशनतर्फे भारतीय संविधानाचे निःशुल्क वितरण

महाड येथे भीमाची लेकरं ऑर्गनायझेशनतर्फे भारतीय संविधानाचे निःशुल्क वितरण

71

✒️महाड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

महाड(दि.21मार्च):- भीमाची लेकरं ऑर्गनायझेशन, नागपूर महाराष्ट्र तर्फे क्रांतिभूमी महाड येथे ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त भारतीय संविधानाचे निःशुल्क वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करुन बुद्ध वंदना घेण्यात आली.

महाड येथे आलेल्या अनुयायांना भारतीय संविधानाचे निःशुल्क वितरण करण्यात आले असून सर्वांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व उल्लेखनीय उपक्रमाचे कौतुक केले.

सदर कार्यक्रम डॉ. दिलीप पाटील मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. संजय रायबोले, सचिव यांनी केले. त्यांनी संघटनेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आप्पासाहेब समिंदर, उपजिल्हाधिकारी, यांच्या हस्ते झाले. प्रमुख वक्ते म्हणून मा. सिद्धेश्वर कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीदर – कर्नाटक, मा. येतीश हाडके, उपसंचालक, दूरदर्शन विभाग, मुंबई, मा. एस. पी. दीक्षित, माजी जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, कोल्हापूर, मा. अरविंद कांबळे सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा, कोल्हापूर, डॉ. संतोष पाटील, मुंबई व प्रा. सुधाकर कांबळे, पोलादपूर – रायगड यांनी आपल्या व्याख्यानातून भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच भीमाची लेकरं ऑर्गनायझेशनच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून मा. तारा मेश्राम वार्ताहर, दलित उद्धार टीव्ही चॅनेल, नागपूर तसेच मा. मंगला यूईके अध्यक्ष, आदिवासी मंडळ, नागपूर या आपल्या पारंपरिक आदिवासी वेशभूषेत उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन चवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बालाजी लातुरे, कोल्हापूर यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रा. सुधाकर कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. बालाजी लातुरे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

या कार्यक्रमाची साठी डॉ. चंद्रमणी गजभिये, डॉ. सद्गुरुनाथ गायकवाड, प्रा. मंगेश वागदे, डॉ. उमेश कुऱ्हाडे, डॉ. सिद्धार्थ वाकूडे, डॉ. मनोहर बांदरे, प्रा. लितांज उके, प्रा. अरविंद पाझारे, आयु. सुरेश गजभिये, आयु. दिनेश बोधनकर, सुहास आढाव आदी मान्यवर महाराष्ट्रातील विविध विभागातून उपस्थित होते.