Home महाराष्ट्र गंगाखेड नगर परिषदेत अधिकाऱ्यांची जनगणना पूर्वतयारीची पाहणी

गंगाखेड नगर परिषदेत अधिकाऱ्यांची जनगणना पूर्वतयारीची पाहणी

85

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.2एप्रिल):-नगर परिषद कार्यालयामध्ये जनगणना पूर्वतयारी संदर्भात माहितीची सखोल पडताळणी करण्यात आली.यासाठी सहायक संचालक व जिल्हा समन्वयक बी.प्रसाद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जनगणना कक्षाचे समन्वयक संदीप कुलकर्णी,अल्ताफ यांनी (दि.१ एप्रिल बुधवार) रोजी गंगाखेड नगर परिषद कार्यालयाला भेट दिली.यावेळी त्यांनी जनगणना प्रक्रियेतील विविध बाबींचा आढावा घेतला आणि प्रत्यक्ष कामकाजाची माहिती तपासून पाहिली संबंधित नोंदी,कागदपत्रे व माहिती प्रणालीची अचूकता याची खात्री करण्यात आली.या पाहणीदरम्यान कार्यालयीन अधीक्षक नागनाथ साळवे,अकाउंट विभागाचे सुरेश मणियार तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंगाखेड नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत आगामी जनगणना प्रक्रिया सुरळीत व अचूक पार पाडण्याचे मार्गदर्शन केले.जगातील ही सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्याला दिनांक १ एप्रिल बुधवार २०२६ पासून सुरूवात झाली आहे.ही जनगणना पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे.तसेच नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याचा पर्यायही प्रथमच उपलब्ध करून दिला जाणार आहे.दुसरा टप्पा १६ मे ते १४ जून दरम्यान होणार आहे.जनगणना पूर्वतयारीचे हे काम वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे,असेही यावेळी सूचित करण्यात आले.