Home चंद्रपूर अभिजीत मधुकर टेकाम चे युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड इंग्लंड युनायटेड किंगडम येथे उल्लेखनीय...

अभिजीत मधुकर टेकाम चे युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड इंग्लंड युनायटेड किंगडम येथे उल्लेखनीय यश

181

▪️बायोडायव्हर्सिटी अँड कंजर्वेशन विषयात एमएससी चा शैक्षणिक प्रवास सुरू

▪️नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे अभिजित चा गुणगौरव

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.६एप्रिल):-राजुरा येथील म्हाडा वसाहतीत राहणारा अभिजीत मधुकर टेकाम यांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी अभिजित ला “निसर्ग माझा सखा” हे डॉ. प्रीती तोटावार लिखित पुस्तक भेट देऊन गुणगौरव केला . सर्वसाधारण कुटुंबातून शिक्षणाची वाटचाल सुरू करून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवत आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

अभिजीत टेकाम सध्या इंग्लंड युनायटेड किंगडम मधील युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्ड येथे एमएससी बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन हा अभ्यासक्रम करत आहेत. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची त्यांची जिद्द आणि मेहनत प्रेरणादायी आहे. यापूर्वी त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथून बीएससी पर्यावरण विज्ञान पूर्ण केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून एमएससी मानवशास्त्र पदवी मिळवली. तसेच नवी मुंबईतील एसआयईएस कॉलेज येथून पीजीडीएम सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

अभिजीत यांच्या या यशाबद्दल राजुरा येथील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्याकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला असून त्यांच्या यशामुळे अनेकांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे.

त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

यावेळी अभिजित चे वडील मधुकर टेकाम, मनोज आत्राम सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.