

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.6एप्रिल):-शिव मंदिर नाईट क्रिकेट कल्ब रामपूर यांच्या वतीने आयोजित सरपंच चषक प्रिमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना (दि. ४) शनिवार रोजी आयोजित केला होता यामध्ये प्रभारत्न ग्लॅडिएटर संघ व श्री शिवछत्रपती संघ यांच्यात अतिशय चुरशीचा सामना रंगला होता यामध्ये प्रभारत्न ग्लॅडिएटर संघाने विजय मिळवित सरपंच चषकावर आपले नाव कोरले आहे. रामपूर येथिल सरपंच निकीता झाडे यांच्या पुढाकारात रमेश झाडे यांनी प्रथमच रामपूर येथे सरपंच चषकाचे आयोजन केले होते. यामध्ये राजुरा तालुक्यातील विविध क्षेत्रातील वीस संघानी सहभाग घेतला होता.
आयपीएलच्या धर्तीवर तालुक्यातील अनेक खेडाळुंनी आपली नोंदनी केली, त्या खेळाडूंचा लिलाव करुन संघमालकाने बोली लावीत त्यांना आपल्या संघासाठी घेतले. सात दिवस चाललेल्या सायंकाळच्या सामन्याकरीता अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून नाईट क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी आयोजक रमेश झाडे यांनी ग्राउंडवर लाईटच्या प्रकाश झोतात उत्तम आसन व्यवस्था केली असल्याने परीसरातील नागरीकांना दररोज येथिल सामन्यांचा मनमुराद आनंद घेता आला. यावेळी प्रथम विजेत्या संघाचे मालक केतन जुनघरे, राजकुमार डाखरे, स्वप्नील सोळंके यांच्या मार्गदर्शनात संघाला विजय मिळविता आला. या स्पर्धेचा तृतिय क्रमांक तृतिय क्रमांक जय जगन्नाथ संघाला मिळाला विजेत्या संघाला सरपंच निकीता झाडे व बंटी मालेकर यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.
सरपंच चषक आयोजनाकरीता ग्राम पंचायत माजी सदस्य रमेश झाडे, अध्यक्ष विनोद काटवले, उपाध्यक्ष विनोद आस्वले, सचिव प्रज्वल भोंगळे, सदस्य पियुष डाखरे, क्रिष्णा गिते, अच्युत बावणे, हनुमान मालेकर, अमोल मालेकर, सतिष थेरे, अभिजीत मालेकर, अशोक बोबडे, सुरज मालेकर, बंटी मालेकर, मयंक पाचभाई, सौरव शेरकुरे, मंथन झाडे, हर्षल निमकर, मनिष लांडे, बबन लोहे, निखिल कावळे, संदिप पाचभाई, दिलीप ठेंगणे, मयुर गिते, प्रविण कोवे यांनी सहकार्य केले.







