

▪️कोंडवाड्याच्या समोरच्या जागेवर ग्राहक सेवा केंद्राचे अतिक्रमण
▪️मोहाळी (नले.) ग्रामपंचायत कार्यालय काय कुंभकर्णी निद्रेत आहे काय !!?? जनतेचा सवाल
✒️सिंदेवाही(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
सिंदेवाही(दि.11एप्रिल):- सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नले.) ग्रामपंचायतीने मोकाट जनावरांच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी गुरे अतिक्रमण अधिनियम १८७१ अंतर्गत ‘ कोंडवाड्याचे’ बांधकाम केले होते. बांधकाम केलेली कोंडवाड्याची जागा ही ग्रामपंचायत कार्यालयाची आहे.यामागे उद्देश हा होता की, पिके खराब करणारी किंवा सार्वजनिक रस्त्यावर फिरणारी जनावरे डांबून ठेवणे आणि मालकाकडून दंड वसूल करणे.कोंडवाड्यात जनावरांना चारा- पाणी पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची होती.
‘गुरे अतिक्रमण अधिनियम, १८७१’ नुसार ग्रामपंचायत कडून गुरांना कोंडवाड्यात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शेतीचे नुकसान टाळणे, रस्ते अपघात रोखणे आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखणे हा या मागील उद्देश होता.
मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकले जाते.
जनावरांच्या मालकाकडून दंड आणि चराई खर्च वसूल करूनच जनावर सोडले जाते.
अलीकडे अनेक ग्रामपंचायतींमध्ये जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे आणि कोंडवाडे मोडकडीस आल्यामुळे किंवा निधीअभावी कोंडवाड्याची दुरुस्ती होत नसल्याने मोकाट जनावरांचा धुमाकूळ वाढला आहे.
गावातील मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानीस आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने कोंडवाडा कार्यान्वित करणे आवश्यक असले तरी याकडे ग्रामपंचायत कार्यालयाचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मोहाळी (नले.) येथील कोंडवाडा मोडकळीस आला आहे. कोंडवाड्या समोर बँक ऑफ महाराष्ट्र चे ग्राहक सेवा केंद्राचे शेड आहे. ग्राहक सेवा केंद्रा मुळे कोंडवाडा दिसेनासा झाला आहे.काही दिवसांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी मोजणी साठी आले असता त्यांना ग्राहक सेवा केंद्रामुळे कोंडवाड्याची नेमकी जागा कोणती हे ओळखणे देखील कठीण झाले होते.
भविष्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कोंडवाड्यावर हळूहळू पूर्ण अतिक्रमण होऊन कालांतराने कोंडवाड्याची जागा हडप होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत.
कोंडवाड्या समोर ग्राहक सेवा केंद्राच्या शेड ने अतिक्रमण केले असतांना देखील ग्रामपंचायत कार्यालय कुंभकर्णी निद्रेत आहे काय असे जनतेकडून बोलल्या जात आहे.







