Home महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते अशोक जुमडे यांच्या पत्नी निर्मला जुमडे यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते अशोक जुमडे यांच्या पत्नी निर्मला जुमडे यांचे निधन

309

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10एप्रिल):-येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक जुमडे यांच्या पत्नी तथा भाजयुमोचे शहर महामंत्री व तेली समाज युवा अध्यक्ष अमित जुमडे यांच्या मातोश्री सौ. निर्मला अशोक जुमडे (वय ६०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (10 एप्रिल )सायंकाळी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

सौ. निर्मला जुमडे या धार्मिक, मनमिळावू आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच चिमूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जुमडे परिवाराची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.

त्यांच्या पश्चात पती, सासूबाई, चार मुले, एक मुलगी, तीन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता चिमूर येथील मासळ रोड, बस स्थानकासमोरील राहत्या घरून निघणार असून, त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.