

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
शारिरीक ओढ स्त्री आणि पुरुष दोघांना असते पण त्या ओढीत प्रेम आणि वासना यात फरक असतो.प्रेमातली खरी गोडी तर त्यात असते ज्यात काळजी अपलेपणा प्रेम समजदारपणा असतो.आणि वासना जिथे असते ज्यात काळजी अपुलकी प्रेम आधर सम्मान नसतो फक्त शरीराची ओढ असते. आजकालच्या लोकांना प्रेम हेच नेमके काय कळत नाही.बस लग्न करने शारिरीक सुख मूल आणि जबाबदाऱ्या यातच गुंतून गेलाय माणूस.त्यामुळे संसारातील गोडी आणि प्रेमाची ओढ फक्त शारिरीक गरज आहे म्हणूनच जवळीक साधली जाते.कारण माणूस स्वताला तेवढा वेळच देत नाही.ज्यात त्याला प्रेमाचा गोडवा निर्माण होईल असे काही करता येईल.धावपळ सतत धावपळ यामुळे त्यांची प्रेमाची संसारातील गोडी दुरावत चालली आहे खऱ्या प्रेमाचा शुंगाराचा आनंद त्याला लुटता येत नाही. प्रेमाचा गोडवा राहिला बाजूला आणि वादविदच निर्माण होत आहेत.त्यामुळे जीवनाचे खरे सुख आनंद अनुभवायचा असेल तर दोघांनी ऐकमेंकाना समजून घ्या वेळ द्या.तरच प्रेमाची ओढ आणि आनंद तुम्ही लूटू शकता. माणसाच्या मूलभत गरजा चार म्हणजे अन्न, वस्र, निवारा,शरीराची भुक ही चौथी अत्यंत मुलभूत गरज आहे.त्यापैकी प्रथम सर्वात मोठी गरज असते अन्नाची. कारण जिवंत राहण्यासाठी दोन वेळचे अन्न मिळणे आवश्यक असते.आणि यासाठीच माणूस कष्ट करत असतो.ही पोटाची भुक,आणि शरीराची भुक अतिशय वाईट असते.पोटाच्या भुकेसाठी माणूस पडेल ते कष्ट करायल तयार असतो.आणि शरीराची भुक लागली की माणसाची तहान भुक विसरतो. स्रियांनची चिडचिड होते,शरीर थकल्या सारख वाटत,सदैव बैचेन होत राहाते,चेहऱ्यावर तेजी दिसत नाही स्रियांनाच्या शरीरातील केल्शियम कमी होण्याचे कारण पण सेक्सच्या कमतरतेमुळेच किती तरी आजार सेक्स केल्याने नाहीशे होतात त्यामुळे नात्याची गरज ही दोघांनी हवी असते.
#विवाहित स्त्री पर’ पुरुषाच्या प्रेमात का पडते?पर’पुरुषाकडे आकर्षित का होते.अनेक स्त्री परपुरुषाच्या मागे लागताना आपण पाहत आहोत.स्त्री विवाहित असताना देखील परपुरुषाकडे आकर्षित होते.याचे समाजामध्ये प्रमाण जास्त प्रमाणा त वाढलेले दिसून येत आहे. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते?…परपुरुषाकडे आकर्षित का होते?….या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
समाजातील वास्तव मांडणारा विषय. समाजातील आदर्श संसार टिकवण्यासाठी आणि एका स्त्रीचा हक्क तिला मिळण्यासाठी हा विषय घेतला बहुसंख्य स्त्रिया पतिव्रता आहेत. आपली संस्कृती सुद्धा तशी आहे.अनेकवेळा चांगल्या स्त्रियांचा सुद्धा त्यांच्या स्वतःच्याही न कळत पाय घसरतो. त्यांच्या मनात नसतांनाही त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात. प्रश्न मोठा आहे आणि आजच्या समाजात घडणाऱ्या वास्तविकतेचा हा एक भाग आहे. स्त्री ही फिजिकल रिलेशन साठी परपुरुषाकडे आकर्षित होते. स्त्री फिजिकल रिलेशन साठीच परपुरुषाशी मैत्री करते असेच अनेकांना वाटते. इंटरनेट वरील अनेक व्हिडिओ, कथा यामधून सुद्धा असेच चित्र उभे केले जाते. याच विषयावरील TV मालिका सुद्धा हेच प्रसंग दाखवता.स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून अनेक भावनिक गोष्ट हव्या असतात.तिची इच्छा नसतांनाही तिच्या मनाविरुद्ध तिची कृती घडते..विवाहित स्त्रीला नवऱ्याकडून काय काय हवं असतं याचा सखोल विचार कधी केला का? स्त्री अथवा पत्नी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे ती रोबोट नाही. पत्नीला आपल्या नवऱ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा हवा असतो हक्काचा माणूस आपला भावनिक माणूस! नवऱ्यामध्ये तिला असा माणूस हवा असतो की ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून तिच्या सर्व सुखदुःखाच्या भावना व्यक्त करू शकेल. ते सुद्धा अगदी मनमोकळेपणाने मैत्रीच्या नात्यासारख्या..
वैयक्तिक जीवनातील आनंद, हर्ष आणि दुःख हक्काने आणि निःसंकोचपणे निडरपणे व्यक्त करता येईल एवढा हक्काचा आणि विश्वासाचं माणूस तिला आपल्या नवऱ्यात हवा असतो ती त्याच्याजवळ असताना जगातील सर्वोच्च समाधान आणि सुरक्षितता तिला प्राप्त व्हावी. तिने त्याच्या सहवासात जगातील सर्वोच्च व्यक्ती अनुभवायला हवा, तिला तिच्या मनावर फुंकर घालणारा सखा हवा असतो. नवरा बायकोमध्ये या भावनिक नात्याची कमतरता भासते, तेव्हा तिचा न कळत हे सर्व पुरवणाऱ्या व्यक्तीकडे मन झुकायला लागते..अशा व्यक्तीचा सहवास तिला सुरक्षित वाटायला लागते.जगातील प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीशी हक्काच्या माणसाचे, मैत्रीचे नातेसंबंध प्रस्थापित करावे.स्त्री नवऱ्याच्या रिमोट कंट्रोल वर चालणार रोबोट नाही. तिला मन, भावना, आहेत. तिच्या मनाचा भावनेचा आदर करून तिच्याशी नाते असावे. अनेक वेळा पत्नीला गृहीत धरले जाते. नवऱ्यापेक्षा कमी शिकलेली असल्यास बरेचदा तिच्या मतालाही किंमत दिल्या जात नाही. ती एक स्वतंत्र विचाराची व्यक्ती आहे.
तिला सुद्धा भावना, विचार, मन आहे याचा विचार होत नाही..
तिच्या आंतरिक भावना व्यक्त करण्यासाठी तिला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध न झाल्याने ती अस्वस्थ होते, बेचैन होते. श्वास कोंडल्यासारखा होतो.ती भावना मोकळ्या करण्यासाठी तळमळते याच काळात नवऱ्याने तिचे न ऐकल्यास आणि नेमकं याच वेळेत तिला इतर कुणाची भावनिक साथ मिळाली की नैसर्गिकच तीं त्या व्यक्तीकडे आकर्षित होते.
तिची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषाने समजून न घेतल्याने तिला आपली किंमतच शून्य आहे असे वाटायला लागते. तिच्या असण्याने आणि नसल्याने कुणाला काही फरक पडत नाही असे जेव्हा तिला वाटायला लागते तेव्हा ती स्वतःच महत्व हरवून बसते. नवरा आपली एवढी काळजी करत नाही किंमत देत नाही परंतु तिहाईत व्यक्तीला आपलं महत्त्व आहे असे तिला वाटायला लागते. आणि मग तिकडे ती भावनिक झुकल्या जाते. जेव्हा स्त्री कुटुंबात असते तेव्हा तिला तिचा योग्य दर्जा न मिळाल्याने ती उद्विग्न होऊ शकते. अनेकवेळा कुटुंबातून छळ, कपट, कास्थान यामुळे कौटुंबिक प्रेम कमी होणे. हळूहळू ती स्वतःचे दुःख इतरांना सांगायला सुरुवात करते कारण स्वतःचा नवरा आणि कुटुंबीय ऐकत नसल्याने भावना व्यक्त करण्यासाठी भावनिक आधारासाठी कुणीतरी शोधल्या जाते..
भावना जुळल्या गेल्या तरच फिजिकल रिलेशन कडे आवडीने वळल्या जाते.तिच्या अस्तित्त्वाचा, आपलेपणाचा कर्तव्याचा आणि जिव्हाळ्याचा विचार व्हावा.स्त्री खूप कणखर अस्ते ती सहसा आपले पाऊल चुकीच्या दिशेने पडूच देत नाही. पण तिचा कधीच विचार होत नसेल तर मात्र ती एकदा चुकली की समाज आणि इतरांचा विचार् करत नाही. तिच्या सहनशीलतेचा अंत न पाहता. भावनेचा विचार व्हावा.
तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे. हल्लीच्या स्त्रीला तिच्या आयुष्याचा अर्थ कळला तिला तिच्या भावना दडपून जगायचं नाही.चुकीच्या पावला आधी 100 वेळा विचार करते. नवऱ्याने वेळीच सावध व्हावं.







