

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.25मे):- गोटूल बहुउद्देशीय समिती आरमोरीची त्रिमासिक सभा दिनांक 24 मे 2026 रोज रविवारला प्रा. दौलत धुर्वे संस्थापक तथा सचिव गोटूल बहुउद्देशीय समिती आरमोरी व सहसचिव डॉ दिलीप कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा तालुक्यातील मौजा नवरगाव येथे आयोजित केली होती.
सभेत या विषयावर चर्चा करण्यात आले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. समितीच्या प्रशासकीय व तांत्रिक कामकाजासाठी गोळा झालेल्या निधीचा आढावा घेण्यात आला. गोटूल बांधकामासाठी लागणाऱ्या दहा कोटी रुपये च्या अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आर्किटेक्चर ची निवड करणे व अंदाजपत्रक तयार करणे संबंधी चर्चा करून मंजुरी देण्यात आली. आजीवन सदस्य व क्रियाशील सदस्य नोंदणी करणे बाबत चर्चा केली. समितीच्या स्टेज बांधकाम करण्याविषयी चर्चा करण्यात आले. समितीच्या संचालक मंडळातील मृत्यू पावलेल्या रिक्त संचालकाची बहुमताने नियुक्ती करून व बदल रिपोर्ट तयार करण्याविषयी चर्चा करण्यात आले.
सदर सभेला प्रा दौलत धुर्वे, प्रा डॉ दिलीप कुमरे, मिलिंद कोडाप, प्रेमदास कोरेटी, जनहेरसिंग उसेंडी, संजय गावडे, चंद्रकांत उईके, प्रभाकर हलामी, देविदास दुगा, तुकेश नरोटे, राजू परसा, मंगेश मडावी, शशिकांत मडावी, प्रेम गावडे, शाम कुळमेथे, नकुल पेंदाम, विकास जांगी, कपिल कोवा, बारीकराव गावडे, राजीराम कुमोठी, नरेंद्र पदा, मनीराम किरंगे, अभय पदा, केजुराम मडावी, निकेश गावडे, सावन किरंगे, भूषण हिचामी आदी समितीचे आजीवन सदस्य व क्रियाशील सदस्य उपस्थित होते.







