Home महाराष्ट्र व्यंकटेश विद्यालयात 2001 बॅचचा रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा साजरा

व्यंकटेश विद्यालयात 2001 बॅचचा रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा साजरा

234

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.2जून):-येथील व्यंकटेश विद्यालयातून 2001 या वर्षी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, तब्बल 25 वर्षानंतर मित्र – मैत्रिणी भेटण्याचा योग आला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, शाळा व गुरुजन वर्ग यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, 31 मे 2026 रोजी हा विद्यार्थी मेळावा व्यंकटेश विद्यालय गंगाखेड या ठिकाणी संपन्न झाला.

वर्गातील गुरुजनांचा आदर सत्कार करून शाळेसाठी उपयुक्त भेट देण्यात आली. 

या स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी मंचावर मुख्याध्यापक देशपांडे सर, उप मुख्याध्यापक बाळासाहेब राखे, राठोड सर, काडवदे सर, सूर्यवंशी सर, हराळे सर, सानप सर, भदाडे सर, गोविंद मामा उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक या बॅच च्या विद्यार्थ्यांनीच केले. उपस्थित सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले. 

शालेय जीवनातील आठवणीस उजाळा देत, प्रफुल्लित वातावरणातून, सर्वच उपस्थितांना, उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले गेले. 

सुमधुर संगीत गाण्याची मैफल रंगली असताना, गायक निखील घारे, यांनी आपल्या आवाजात नवीन जुन्या गाण्यातून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 

अनेक माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी या बॅच च्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

दिवसभर मनमुराद आनंद लूटत आणि या रौप्य महोत्सवी संमेलनाच्या आठवणी कायम आपल्या हृदयात ठेवून वर्गमित्र आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले.