Home महाराष्ट्र सैन्य तयार आहे, सेनापती पाहिजे!

सैन्य तयार आहे, सेनापती पाहिजे!

122

आजची कांग्रेस भाजप ला शह देऊ शकत नाही. ते खाऊन पिऊन सुस्थ पहुडलेले आहेत. वाट पाहात आहेत कि, लोक मोदी पासून त्रस्त होतील आणि आम्हाला उठवायला येतील.

     पण आता लोकांना कळले आहे, हे उठणार तर नाहीतच, उलट हेच भाजप मधे जाण्यासाठी रस्ता, एजंट, इव्हेंट शोधत आहेत.जल बिन मछली जगू शकत नाही. तशी सत्ता मत्ता शिवाय कांग्रेस नेते जगू शकत नाहीत. शिवाय राहुल गांधी.

     राहुल गांधी असे तयार झाले आहेत कि, मोदींच्या संपुर्ण मंत्री मंडळाला पुरून उरतील. निडर, बेडर, लिडर. पण तशी माणसे प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात नेमली पाहिजे. नवीन दमाचे शिलेदार जोडले पाहिजे. ते अजूनही डायबेटीक्स, पॅरालिसीस झालेल्या नेत्यांवर विसंबून आहेत. मी स्वतः अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण , हर्षवर्धन सपकाळ यांना भेटलो. या विषयावर चर्चा केली. ते अजूनही अनकॉन्शीयस अवस्थेत आहेत. त्यांचा अनेस्थिया अजूनही कमी झाला नाही. आयसीयू मधील माणसे आहेत. पेशंट. प्रकृती स्थिर राहाण्यासाठी.

     आता अभिजित दिपके यांनी तरूणांमध्ये जोश निर्माण केला आहे. तरूण मोठ्या संख्येने जागा झाला आहे. याला संघटनात्मक आणि संविधानिक मार्गाने नेण्याची गरज आहे. ही उणिव राहुल गांधी यांनी भरून काढली पाहिजे. तरूण नाकर्ते नेत्यांची उणिव भरून काढतील.सैन्य तयार आहे, सेनापती पाहिजे.

      जे बुद्धिमान लोक सामाजिक काम करतात ते संघटनात्मक आणि राजकीय चळवळ चालवू शकत नाही. कारण त्यांचे प्रश्न लहान असतात आणि उत्तर ही लहान असते. क्षेत्र लहान असते आणि विस्तार कमी असतो. म्हणून ते राजकीय चळवळ चालवू शकत नाही.

     मी स्वतः अशा अनेक बुद्धीवंताशी बोललो. ते प्रामाणिक आहेत. पण त्यांच्यात बुद्धी अहंभाव, कौशल्याचा अहंभाव, संपत्तीचा अहंकारचा असतो. सुपीरिटी कॉम्प्लेक्स असतो. साधा माणूस शेजारी बसलेला सहन होत नाही. मुळातच बसू देत नाहीत. अंतर ठेवून असतात. आधी चौकशी करतात. हा कोण? येथे का बसला?तसे राजकीय नेत्यांचे नसते. राहुल गांधी कोणत्याही माणसाची चौकशी न करता अलिंगण देतात. महात्मा गांधी तर बॅरीस्टर होते. तरीपण गरीब लोकांसारखे पंचा नेसून राहायला लागले. फोर्थ क्लास मधून प्रवास करीत होते. याला जमीनीवर असणे म्हणतात. लक्झरीयस माणूस जमीनीवर पाय ठेवत नाही.

    उच्चशिक्षित अरविंद केजरीवाल तर उशाला पाणीची बाटली घेऊन रस्त्यावर झोपले होते. अजूनही कोट, टॉय वगैरे वापरत नाही. उच्चशिक्षित ममता बैनर्जी तर स्लीपर घालून फिरतात. ही मानसिकता असली पाहिजे. जमीनीवर चालण्याची.

      जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन यांचा तर ६६ फूट कट आऊट लावला गेला. जिवंतपणीच. ६६ फुटांवरून जमीनीवरचा माणूस मुंगीएवढा दिसतो. पुन्हा निवडून आले, मंत्री बनले तर १३२ फूटाचा कट आऊट लागेल. १३२ फुटांवरून जमीनीवरचा माणूस ऊ एवढा दिसेल.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२