Home चंद्रपूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व अमृत गार्डन स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व अमृत गार्डन स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

27

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.6जून):-जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, शाखा राजुरा यांच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवडीसोबतच त्यांच्या संगोपन व संरक्षणाचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत नगर परिषद राजुरा येथील तलावाच्या काठावर वड, पिंपळ व आंबा या पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणानंतर या वृक्षांचे नियमित संवर्धन करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी व्यक्त केला. त्यानंतर तहसील कार्यालय, राजुरा परिसरातील अमृत गार्डन येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानादरम्यान झाडांच्या सभोवतालचा तसेच संपूर्ण परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली.

पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड आणि स्वच्छता या दोन्ही बाबी तितक्याच महत्त्वाच्या असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्यासह नरेंद्र देशकर, श्रीरंग ढोबळे, बबलू चव्हाण, रवी बुटले, संतोष चंदनखेडे, मोहनदास मेश्राम, शंकर बुऱ्हाण, विलास कुंदोजवार, प्रतीक काकडे, वसंत निखाडे, सुनैना तांबेकर, मंदा बुऱ्हाण, माधुरी निखाडे, बबिता कांबळे, मेघा धोटे, संजीवनी धांडे, मालनबाई बोभाटे आदी पर्यावरणप्रेमी नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.

पर्यावरण संवर्धन ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी आहे. वृक्षारोपणासोबत वृक्षांचे संवर्धन आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प प्रत्येकाने केल्यास हरित, स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.