Home चंद्रपूर भिमा कोरगाव मानवंदना कार्यक्रम चिमुरात ३ जानेवारीला-खासदार चंद्रशेखर आजाद यांची विशेष उपस्थिती!

भिमा कोरगाव मानवंदना कार्यक्रम चिमुरात ३ जानेवारीला-खासदार चंद्रशेखर आजाद यांची विशेष उपस्थिती!

210

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.3जानेवारी):-भिमा कोरगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना अर्पण करण्यासाठी 3 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन बि. पी. एड.मैदान चिमूर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास खासदार चंद्रशेखर आजाद हे प्रमुख उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा मानवंदना कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असून, सामाजिक जागृती व ऐतिहासिक स्मृती जपण्याची परंपरा यानिमित्ताने कायम ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमात स्वप्नील मेश्राम यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, ते सामाजिक आणि वैचारिक विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनिष साठे, महाराष्ट्र राज्य प्रभारी रुपेश बागेश्वर, प्रदेश उपाध्यक्ष रुपचंद टोपले प्रदेश सचिव दिगांबर फलटनकर तसेच महाराष्ट्र राज्य महासचिव डॉ. जे. बी. रामटेके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

हा मानवंदना कार्यक्रम तालुका अध्यक्ष अमीत भिमटे यांच्या पुढाकाराने व नियमित प्रयत्नातून दरवर्षी यशस्वीपणे आयोजित केला जात असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा सातत्याने पुढे चालवली जात आहे.

भिमा कोरगावच्या ऐतिहासिक लढ्याचे स्मरण, सामाजिक समता व बंधुतेचा संदेश देणारा हा मानवंदना कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.