Home चंद्रपूर ग्रामगीता महाविद्यालयामध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वीरित्या संपन्न

ग्रामगीता महाविद्यालयामध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वीरित्या संपन्न

126

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.5जानेवारी):- ग्रामगीता महाविद्यालयात दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी माननीय प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये ‘बेकर्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे’ ही उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपनी सहभागी झाली होती. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनील चव्हाण, एचआर मॅनेजर, विशेष अतिथी म्हणून श्री सखाराम खरडे, सिनिअर टीम लीडर, तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले उपस्थित होते.

प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये 151 मुलांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी कंपनीने  12 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिले. हा कार्यक्रम करिअर कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेल तसेच केमिस्ट्री डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात संघर्ष केले तर यश संपादन होतोच असे प्रतिपादन श्री. सुनील चव्हाण यांनी केले.

तर अश्या प्रकारचे प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन पुढेही घेण्यात येईल व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनि या संधीचा फायदा नक्कीच घ्यावा असे संबोधन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नागेश ढोरे यांनी केले,  प्रस्तावना प्रा. डॉ. हुमेश्वर आनंदे यांनी, तसेच आभारप्रदर्शन प्रा. डॉ. मृणाल वऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.