Home महाराष्ट्र भव्यदिव्य पदभार सोहळा थाटामाटात संपन्न

भव्यदिव्य पदभार सोहळा थाटामाटात संपन्न

370

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.1जानेवारी):-01 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षात नगराध्यक्षा पदभार स्वीकार सोहळा भव्य-दिव्य थाटामाटात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गंगाखेड शहराच्या इतिहासात प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवकांचा पदभार स्वीकार सोहळा भव्य-दिव्य व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) व शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा अधिकृत पदभार सोहळा पार पडला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाचे गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे, शिवसेना गटनेते क्षितीज चौधरी, भाजपा नगरसेवक संदीप सानप तसेच समन्वयक माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मनोगत व्यक्त करताना माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी नगरपरिषदेचा कारभार पारदर्शक, निष्पक्ष व निर्भिड राहील, असे स्पष्ट केले. नगरपरिषदेतून होणारी सर्व कामे भ्रष्टाचारमुक्त व गतिमान असतील. मासिक कामकाज अहवाल जनतेसमोर मांडण्यात येईल, तसेच नगराध्यक्ष पदाच्या अधिकारांचा वापर केवळ जनतेच्या सेवेसाठीच केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी कोणत्याही राजकीय विषयांवर चर्चा न करता, नगराध्यक्ष पदाच्या अधिकारातूनच शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे स्पष्ट करत बहुमताबाबतच्या चर्चेस पूर्णविराम देण्यात आला.

या पदभार सोहळ्यास शहरातील नागरिक, विविध वर्तमानपत्रांचे संपादक, पत्रकार तसेच नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.