

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.3जानेवारी):-शौर्याचं प्रतीक असलेले स्वाभिमानाची लढाई जिंकणाऱ्या भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज सैन्यातील महार रेजिमेंटच्या शूरवीरांनी पेशवाईविरुद्ध दिलेल्या ऐतिहासिक लढ्याला मोठ्या अभिमानाने स्मरण करण्यात येते.
दरवर्षी १ जानेवारीला संपूर्ण देशभरामधून आंबेडकरी अनुयायी मानवंदनासाठी भीमा कोरेगाव येथे जात असतात या ऐतिहासिक विजयाच्या स्मृतिदिनानिमित्त गंगाखेड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने (दिनांक १ जानेवारी गुरुवार) रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर शूरवीरांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी तहसीलदार उषाकिरण शृंगारे,भारतीय बौद्ध महासभेचे पंडितराव पारवे,गोरखनाथ कांबळे, बार्टीचे जिल्हा समन्वयक मुंजाजी कांबळे,बामसेफचे आर.जी.मस्के,समता सैनिक दलाचे सिद्धार्थ कांबळे,वंचित बहुजन आघाडीचे शुद्धोधन सावंत,रास्त भाव दुकानदार संघटना जिल्हा सचिव प्रवीण रायभोळे,निवृत्ती व्हावळे,बौद्धाचार्य रमेश जोंधळे,पिराजी कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी,समता सैनिक दलाचे पदाधिकारी युवक-युवती,महिला भगिनी आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.







