

✒️विशेष प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
पुणे(दि.5जानेवारी):-जिल्ह्यातील व खेड तालुक्यातील किल्ले वाफगाव या ठिकाणी सोमवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी महाराजा यशवंतराव (प्रथम )होळकर यांच्या राज्याभिषेक स्मृती दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे व सहभागी व्हावे असे आव्हान महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समिती परभणी, जिल्हाप्रतिनिधी सुरेश दादा बंडगर यांनी केले आहे.पक्ष,संघटना,पोट जाती,आपसातील हेवेदावे, हे विसरून एक सामाजिक जाणिवेतून आपण फक्त धनगर आहोत या एकच जाणीवने धनगर समाज बांधवांनी एकत्र येऊन चक्रवती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक स्मृती दिनानिमित्त सोहळ्यास उपस्थित राहून एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हावे. शूर, लढवय्ये यशवंतराव होळकर यांचे आपण वारसदार असल्याचा अभिमान धनगर समाज बांधवांनी उराशी बाळागला पाहिजे.
चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर हे छत्रपती शिवरायांच्या नंतरचे एकमेव असे राजे आहेत की.त्यांनी आपल्या वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी म्हणजे 6 जानेवारी 1805 रोजी वैदिक पद्धतीने आपला राज्याभिषेक केला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किल्ले वाफगाव या ठिकाणी येत्या दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या मूर्तीवर होळकर राज परिवार प्रमुख लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते व प्रमुख संघटना प्रतिनिधीच्या उपस्थित केला जाणार आहे.
यासाठी किंतु परंतु न ठेवता हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समिती परभणी जिल्हा प्रतिनिधी सुरेश दादा बंडगर यांनी केले आहे.आणि अशाच प्रकारचे आव्हान महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्यभिषेक महोत्सव समिती परभणि जिल्हा प्रतिनिधी सुरेश दादा यांनी धनगर समाज बांधवांना केले आहे.
होळकर घराण्याचे वंशज भूषणसिह राजे होळकर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून महाराजा चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या स्मृति निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला राज्यभरातील होळकर घराण्याचे माहेरकडील सासरकडील वंशज उपस्थित राहतात







