

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.5जानेवारी):- शहरातील नाभिक समाजाच्या वतीने आझाद दस्तचे संस्थापक क्रांतिवीर विठ्ठलभाई कोतवाल व क्रांतिवीर हिराजी पाटील यांच्या ८२ व्या शहीद दिनानिमित्त (दिनांक ०२ जानेवारी शुक्रवार) रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील क्रांतिवीर विठ्ठलभाई कोतवाल चौक येथे देशभक्तीच्या वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून शहीदांना आदरांजली अर्पण केली.त्यानंतर पाच तोफांची सलामी देत क्रांतिवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यात आली.या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे,सुनील चौधरी,मेजर हनुमंत कांबळे, माधव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून क्रांतिवीर विठ्ठलभाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या देशभक्ती,बलिदान व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बालासाहेब पारवे,अशोक डमरे,पांडुरंग नेजे,नकुल डमरे,पांडुरंग कांबळे, शिवाजी डमरे,ज्ञानेश्वर डमरे,पंकज वावगुडघे,पप्पू राऊत,बंडू डमरे,भागवत वावगुडघे,शिवा शिंदे,सुदर्शन शिंदे, दिगंबर डमरे,दीपक पारवे,आत्माराम नेजे,नागनाथ कुठे,लल्ला डमरे,अमोल नेजे,सह नाभिक समाज बांधवानी परिश्रम घेतले.







