Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात ‘युवा मॅरेथॉन स्पर्धा’ उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘युवा मॅरेथॉन स्पर्धा’ उत्साहात संपन्न

66

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.5जानेवारी):- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी शिक्षण मंडळ, संस्थेच्या वतीने दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी सकाळी ७.०० वाजता ‘भव्य युवा मॅरेथॉन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन चोपडा येथील नगर परिषदेचे नगरसेवक तसेच स्पर्धेचे प्रयोजक रमाकांत नथू ठाकूर व  मनाली ट्रेडर्सचे संचालक व प्रयोजक विपुल गौतम छाजेड तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. यावेळी स्पर्धेच्या आयोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

        या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के. एन. सोनवणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक व चोपडा नगर परिषदेचे नगरसेवक रमाकांत ठाकूर, प्रमुख पाहुणे विपुल छाजेड, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ,  रजिस्ट्रार डी.एम.पाटील, मुन्ना ठाकूर क्रीडा संचालक डॉ. सौ.के.एस. क्षीरसागर व शारीरिक शिक्षण विभाग शिक्षक अमोल पाटील आदि उपस्थित होते.

    या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास १५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत स्टाफ महिला गटातून प्रथम-सुषमा भावराव पाटील, द्वितीय-सौ. सुनीता भगवान पाटील व तृतीय-प्रणाली कैलास तायडे,  पुरुष स्टाफ गटात प्रथम- डॉ. मोतीराम पावरा, द्वितीय- उमंग संजय सोनवणे, तृतीय-सुयश अशोक पाटील त्याचप्रमाणे मुलांच्या गटात प्रथम- कुलदीप छोटू पाटील, द्वितीय-कुणाल दिगंबर धनगर, तृतीय-रोहित वाल्मिक शिंदे त्याचप्रमाणे मुलींच्या गटात प्रथम-अश्विनी योगेश पाटील, द्वितीय-पल्लवी चंदूलाल कोळी, तृतीय- मयुरी ज्ञानेश्वर सुलताने इत्यादी खेळाडूंनी पारितोषिके प्राप्त केली.या स्पर्धेतील मुले व मुलींच्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम -रुपये २१००/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक रुपये १५००/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी व तृतीय पारितोषिक रुपये १०००/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी अशी पारितोषिके देऊन  विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेच्या आयोजनाकामी प्रायोजक म्हणून नगरसेवक रमाकांत ठाकूर व मनाली ट्रेडर्सचे संचालक विपुल छाजेड यांनी सहकार्य करून महत्वपूर्ण भूमिका बजावली.

    याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रा.डॉ. म्हणाले की, ‘मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय संधी उपलब्ध करून देते.त्याचबरोबर आरोग्य संवर्धनाचा देखील संदेश देते म्हणून अशा स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे. सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे’.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्पर्धा समन्वयक व क्रीडा संचालक डॉ.सौ.के.एस.क्षीरसागर यांनी केले तर आभार समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी मानले.

     या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा समन्वयक व क्रीडा संचालक डॉ. सौ.के.एस. क्षीरसागर, अतुल पाटील, क्रीडा शिक्षक अमोल पाटील तसेच सर्व आयोजन समिती प्रमुख, सदस्य व प्राध्यापक बंधू-भगिनी यांनी अथक परिश्रम घेतले.या स्पर्धेप्रसंगी संस्थेच्या अंतर्गत विविध शाखांचे विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक- शिक्षकेतर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते