Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेजच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा अंतवडीत शुभारंभ

वेणूताई चव्हाण कॉलेजच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा अंतवडीत शुभारंभ

75

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.7जानेवारी):- वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी मौजे अंतवडी (ता. कराड) येथे उत्साहात संपन्न झाला.

     या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. प्रसाद खेडेकर (सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती कराड) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती उज्वला हनुमंत साळुंखे (सरपंच, अंतवडी) होत्या. यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. श्री जसराज पाटील (बाबा) यांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली. 

        याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रसाद खेडेकर म्हणाले की, “व्यक्तिमत्वाची जडणघडण ही विविध अनुभवांतून होत असते. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक हितासोबतच समाजहित जपणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि नेतृत्वगुणांची जोपासना अशा शिबिरातून होते. नेतृत्व कसे करावे याचे प्रशिक्षण एन.एस.एस. शिबिरातून मिळते, त्यामुळे अशा शिबिरांचे महत्त्व मोठे आहे.” 

      अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. श्रीमती उज्वला साळुंखे म्हणाल्या की, “श्रमदानाची सवय राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. विद्यार्थ्यांसोबत गावकऱ्यांना एकत्र काम करता यावे, या उद्देशानेच हे शिबिर आमच्या गावात व्हावे ही आमच्या गावकऱ्यांची इच्छा होती.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. जाधव, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, , जिमखाना उपाध्यक्ष डॉ. (श्रीमती) एस. आर. सरोदे, उपसरपंच शीतल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मनोज माने, मा. श्री सुरेश शिंदे, मा. श्री जिजाबा शिंदे, मा. श्री हणमंत शिंदे, मा. श्री सुभाष निकम, मा. श्री. युवराज शिंदे, उपप्राचार्य आर. ए. कांबळे, महामुनी सर, सामाजिक कार्यकर्ते श्री संभाजी शिंदे, सौ. सीमा चव्हाण, सौ. मनीषा शिंदे तसेच गावातील विविध समित्यांचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व एन.एस.एस. गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. आर. आर. जाधव यांनी केले. शिबिराचा उद्देश कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. ए. पाटील यांनी स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. डी. पी. जाधव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. (श्रीमती) एस. सी. भस्मे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.