Home महाराष्ट्र पत्रकार दिना दिवशी चक्क पोलीस निरीक्षकाच्या विरोधातच करमाळा येथे पत्रकार संघटनेचे आंदोलन

पत्रकार दिना दिवशी चक्क पोलीस निरीक्षकाच्या विरोधातच करमाळा येथे पत्रकार संघटनेचे आंदोलन

212

✒️नागेश खुपसे पाटील(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)

सोलापूर(दि.7जानेवारी):-करमाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दिलेल्या पत्रकाराला अपमानास्पद वागणूक निषेधार्थ आज पत्रकार दिना दिवशी करमाळा तहसील कार्यालयासमोर पत्रकार संघटनेने काळे फिती लावून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संघटनेचे करमाळा तालुका उपाध्यक्ष शितल कुमार मोटे यांनी पत्रकाराला माहिती बोलताना दिली

याबाबत अधिक माहिती देताना पत्रकार मोठे म्हणाले की करमाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी त्यांच्या दालनात माझ्यावर थेट आरोप करीत मला आपणास वागणूक दिली या घटनेच्या निषेधार्थ उद्या पत्रकार दिनाच्या दिवशी करमाळा शहर तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार करमाळा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून सदर घटनेचा निषेध करणार आहे 

सदर आंदोलनामध्ये करमाळा शहर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार मोटे यांनी केले आहे 

याबाबत पत्रकार बांधवांनी करमाळा पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा यांना याबाबतचे निवेदन दिले आहे