

▪️शिक्षक साहित्य संघातर्फे सावित्रीबाई फुले जयंती संपन्न
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.8जानेवारी):-“क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी लग्नानंतर सावित्रीबाईंना लिहायला आणि वाचायला शिकविले. त्यांना शिक्षिकेचे प्रशिक्षण दिले.मुलींना शिक्षणाची बंदी असलेल्या काळात सावित्रीबाई आणि जोतीरावांनी दि.१ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.या शाळेत सावित्रीबाईंनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. त्या भारताच्या आद्य महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या . भिडेवाड्यात मुलींना शिकविण्यासाठी जात असताना त्यांच्यावर शेण आणि दगड मारल्या जात.
या विरोधामुळे सावित्रीबाईंनी सोबत नेहमी एक साडी ठेवण्यास सुरुवात केली, पण मुलींना शिक्षण देणे थांबविले नाही. फुले दांम्पत्यांनी 1848 ते 1852 या चार वर्षात पुण्यात व आजूबाजूला बहुजनांसाठी 18 शाळा स्थापन केल्या. दलित व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी विद्येचे दारं उघडली. विद्येला धन मानणाऱ्या सावित्रीबाई फुले या भारतीय स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील एक प्रेरणादायी पर्व आहेत.”असे विचार प्रमुख वक्ते पदावरून प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते शिक्षक साहित्य संघाच्या राज्य शाखा व अमरावती शाखेतर्फे 3 जानेवारी 2026 ला संपन्न झालेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.
शिक्षक साहित्य संघाच्या शामनगर,अमरावती येथील कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शरदचंद्र बिडकर, जिल्हाध्यक्ष शिक्षक साहित्य संघ अमरावती ,
.प्रमुख वक्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे, श्री गजेंद्र पाथरे आशीष इंगळे होते.
सर्वप्रथम अध्यक्ष,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा.अरुण बुंदेले यांनी “क्रांतिज्योती” या स्वरचित वंदन गीताचे गायन केले .
अध्यक्ष श्री शरदचंद्र बिडकर व प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. अतुल ठाकरे यांनी याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला .
कार्यक्रमाचे संचालक आशिष इंगळे तर आभार गजेंद्र पाथरे सर यांनी मानले.
कार्यक्रमाला शिक्षक साहित्य संघाचे सदस्य उपस्थित होते.







