Home अमरावती श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती व शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या...

श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती व शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने

134

▪️दि .१० व ११ जानेवारीला दोन दिवशीय ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू

▪️संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.गणेश चव्हण उद्घाटक मा.हर्षवर्धन देशमुख स्वागताध्यक्षपदी ॲड.जे.व्ही.पाटील पुसदेकर

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.9जानेवारी):- श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचलित श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय,अमरावती तथा शिक्षक साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य व मासिक शिक्षकमत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन शनिवार दि.१० व दि.११ जानेवारी २०२६ मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी श्री.शिवाजी शिक्षण महाविद्यालय,शिवाजी नगर,पंचवटी चौक,अमरावती येथे संपन्न होत आहे.

या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.गणेश चव्हाण,नागपूर,उद्घाटक

 मा.श्री हर्षवर्धन प्रतापसिंह देशमुख,अध्यक्ष,श्री शिवाजी शिक्षण,संस्था,अमरावती.

स्वागताध्यक्ष मा.ॲड.जे.व्ही. पाटील (पुसदेकर),उपाध्यक्ष,श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती असून विशेष अतिथी ॲड.गजाननराव पुंडकर, उपाध्यक्ष,श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती.,मा. प्रा. वसंतराव पुरके (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य)

प्रा.डॉ.सदानंद देशमुख, पूर्वसंमेलनाध्यक्ष,डॉ.श्रीकांत तिडके, ज्येष्ठ साहित्यिक क्रीडामहर्षी मा.श्री.हेमंत डोणगावकर, नागपूर राहणार आहेत .

      या शिक्षक साहित्य संमेलनाचे निमंत्रक डॉ.विनय माणिकराव राऊत ,प्राचार्य,श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती असून सहआयोजक शिक्षक साहित्य संघ,जिल्हा शाखा,अमरावती आहेत.

               या शिक्षक साहित्य संमेलनामध्ये शैक्षणिक पोस्टर प्रदर्शनी,पुस्तक प्रकाशन, गुणवंतांचा गौरव व सत्कार असून उद्घाटन कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ.मंदा नांदुरकर व प्रा. सुरेंद्र पाथरे करणार आहेत तर आभार मा.शरदचंद्र बिडकर जिल्हाध्यक्ष, शिक्षक साहित्य संघ अमरावती मानतील.

       दि.१० जानेवारीला कर्मयोगी संत गाडगेबाबा समाधी मंदिरापासून ग्रंथदिंडीला सकाळी नऊ वाजता प्रारंभ होईल.

परिसंवाद

        तिसऱ्या सत्रात “सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत कोण सुरक्षित आहे? विद्यार्थी, शिक्षक, समाज की अन्य?” या विषयावर परिसंवाद रंगणार असून

परिसंवादाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुडीकर, लातूर तर प्रा.मंगेश भुताडे ,डॉ. सुशिलकुमार चिमोरे,डॉ.मारोती कसाब,डॉ.लिना निकम हे वक्ते आपले विचार मांडणार आहेत.

शैक्षणिक सादरीकरण व पोस्टर प्रदर्शनी

        चौथ्या सत्रात दु.३ वाजता प्रशिक्षणार्थी विद्यार्थी शिक्षकांचे शैक्षणिक सादरीकरण प्रा.डॉ. किशोर क्षत्रीय यांच्या संयोजनामध्ये श्री. शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचे विद्यार्थी व प्राध्यापक सादरीकरण करणार आहेत. तर शैक्षणिक पोस्टर प्रदर्शनी डॉ.एस.आर.बिहाडे,डॉ. व्ही.एन.कडू, डॉ.एस.एस.येळणे यांच्या आयोजनामध्ये होणार आहे . 

कथाकथनाचा कार्यक्रम

        पाचव्या सत्रात दु.४ वाजता प्रा. विलास सिंदगीकर, लातूर यांच्या अध्यक्षतेत कथाकथन असून यामध्ये अंबादास केदार, सुषमा ईसळ, शीलवंत वाढवे , बालाजी पेटकर, गोपाल डालके कथा सादर करतील .

             सहाव्या सत्रात सांय.५ वा.”मी राजमाता जिजाऊ बोलते .”हा एकपात्री नाटयप्रयोग नाट्यकर्मी प्रा.डॉ. विना राऊत सादर करणार आहेत. .

निमंत्रितांचे कवीसंमेलन पाहिले

         सातव्या सत्रात रात्री ८.3० वा. प्रा.प्रभाकर कौलखेडे (ज्येष्ठ कवी व साहित्यिक)यांच्या अध्यक्षतेत निमंत्रितांचे पहिले कवीसंमेलन असून या कवी संमेलनाच्या प्रमुख अतिथी डॉ.अनघा सोनखासकर -सोमवंशी (बालभारती पुणे), गुलाब सोनोने,अंकुश सिंदगीकर (जळकोट) असून या कवी संमेलनाचे सूत्रसंचलन चित्रा कहाते (नागपूर), प प्रा.रणजित गणोदे (दर्यापूर) करणार आहेत.

एकपात्री प्रयोग

        दि.११ जानेवारी २०२६ संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आठव्या सत्रात सकाळी १०.३० एकपात्री प्रयोग”मी महात्मा जोतीराव फुले बोलतो.” हा एकपात्री प्रयोग नाट्यकर्मी प्रा.पुंडलिक भामोदे (अकोला ) तर “मी सावित्रीबाई फुले बोलते ” हा नाट्यप्रयोग नाट्यकर्मी प्रा.डॉ.विना राऊत (नागपूर ) सादर करणार आहेत.

मुक्त संवाद – कार्यक्रम

             आठव्या सत्रात स.११ वा.मुक्त संवाद आहे. ” क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्र “या विषयावर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मा.श्री दिलीपबाबू इंगोले,कोषाध्यक्ष,श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती यांच्यांशी तसेच ” भाषा साहित्य क्षेत्र “या विषयावर डॉ.जगतानंद भटकर (समन्वयक भाषिणी माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार) यांच्याशी जयदीप सोनखासकर (संस्थापक अध्यक्ष, शिक्षक साहित्य संघ, महा. राज्य)हे संवाद साधणार आहेत.

        तर ” प्रशासकीय क्षेत्र” या विषयावर श्री. अनिल भटकर (उप विभागीय अधिकारी, अमरावती) यांच्याशी सौ.राजश्री ज. सोनखासकर (उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अकोला)या संवाद साधणार आहेत.या कार्यक्रमाला

मा. श्री. दादाराव डोल्हारकर (उपायुक्त म.न.पा. अमरावती.)यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

निमंत्रितांचे कवीसंमेलन – दुसरे

                 दहाव्या सत्रात दु.२ वा.असलेल्या ‘निमंत्रितांच्या दुसऱ्या कवीसंमेलनाचे अध्यक्ष परिवर्तनवादी अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले असून प्रमुख अतिथी शिवराज जामोदे,प्रा.अंजली वारकरी व अजय धोटे आहेत.

सूत्रसंचलन प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे,प्रियंका गिरी करणार आहेत.

समारोप व सत्कार समारंभ दु.५ वाजता अकरावे समारोपीय सत्र असून यात खुले अधिवेशन, पुरस्कार वितरण व मान्यवरांचा सत्कार समारंभ आहे. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनय राऊत (श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती) असून प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. गणेश चव्हाण, मा. श्री विलास मराठे (संपादक, दैनिक हिंदुस्थान), प्रा. अरविंद गिहे, प्रा. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, संघर्ष सावरकर उपस्थित राहणार आहेत. या सत्कार समारंभात लोकनेते, साहित्यिक, संपादक, निसर्गवासी भाई प्रभाकरराव सावरकर स्मृती राज्यस्तरीय शिक्षक साहित्यरत्न पुरस्कार 2026 चे वितरण होणार आहे.

         असे प्रा.किशोर क्षत्रीय,श्री आयुष धनवटे तसेच शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय अध्यक्ष जयदीप सोनखासकर, शिक्षक साहित्य संघ अमरावती जिल्हाध्यक्ष श्री शरदचंद्र बिडकर (९२८४ ७० १३८८ ) ,अमरावती यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे .