Home महाराष्ट्र व्यापारी महासंघ गंगाखेड व लायन्स क्लब गंगाखेड टाऊन यांच्या वतीने,नगरसेवकांचा सत्कार समारंभ...

व्यापारी महासंघ गंगाखेड व लायन्स क्लब गंगाखेड टाऊन यांच्या वतीने,नगरसेवकांचा सत्कार समारंभ संपन्न

174

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.15जानेवारी):-येथे व्यापारी वर्गातील निवडून आलेल्या चार नगरसेवकांचा सत्कार समारंभ संपन्न.

 स्वीकृत सदस्य म्हणून नुकतीच निवड झालेल्या मा. विजयकुमार तापडिया, मा. अनिलशेठ यानपल्लेवार, मा. दिलीपशेठ सारडा, मा.गोविंद भाऊ अय्या या सर्व व्यापारी प्रतिनिधींचा व्यापारी महासंघ गंगाखेड – च्या वतीने विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते व लायन्स क्लब गंगाखेड टाउनच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने सन्मान सोहळा, प्रा. डॉ. संग्राम मुंडे कॉम्प्लेक्स डॉक्टर लाईन गंगाखेड येथे आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष अडवोकेट रावसाहेब वडकिले, डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर के पी गारोळे सर, व्यापारी संघाचे अध्यक्ष दगडूशेठ सोमानी, ज्येष्ठ व्यापारी सुभाष शेठ नळदकर, ज्ञानेश्वर राजूरकर, प्रमोदशेठ तम्मेवार , बालासाहेब पारवे सचिन नाव्हेकर. पंडितराव इदाते. गोविंदराव जाधव संदीप कोतवाल कारभारी निरस लक्ष्मण कोकडवार बालाजी महाजन शरद डाके संतोष राठोड नेमीचंद नखत बाबुराव खेडकर ज्ञानेश्वर दादा कापसे पांडुरंग नेजे विलास मंगरूळकर जगदीश तोतला सोनू भैय्या चक्रधर शिंदे विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व्यापारी व लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन चे सर्व सदस्य उपस्थित होते.

 सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी वाडेवाले सर यांनी केले, कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप ॲड रावसाहेब वडकीले यांनी केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमानी मानद सचिव ज्ञानेश्वर राजूरकर व लायन्स क्लब गंगाखेड टाऊनचे कॅबिनेट ऑफिसर केशव देशमुख यांनी परिश्रम घेतले