Home महाराष्ट्र वंदना ग्रुप च्या नामविस्तार दिन साजरा

वंदना ग्रुप च्या नामविस्तार दिन साजरा

113

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.16जानेवारी):-दिनांक 14 जानेवारी रोजी गोल्डन ड्रीम्स विद्दालय गंगाखेड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिना निमित्त ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्रा.डॉ. भीमराव खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.बी.गोटमुकले यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले, प्रा.डॉ.अनिल शिंगारे, प्रा.डॉ.एम.बी.इंगोले, नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण घोबाळे,चंद्रकांत खंदारे,सुमित कामत, डॉ.गुणवंत जगतकर उपस्थिती होते. . नाविस्तार दिनानिमित्त बोलत असताना शिंगारे यांनी नामांतर लढ्यामध्ये इतर जाती जमातीचा ही किती सहभाग होता हे सर्व मुद्देनिहाय स्पष्ट करून सांगितले असता नामविस्तार दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्रा.डॉ. खाडे म्हणाले,प्रबोधन पर व्याख्यान करत असताना तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली त्रिशरण आपण समजून घेतले पाहिजे प्रज्ञा शील करुणा या विचारावर आचरण करून फुले,आंबेडकर विचाराची जोपासना केली पाहिजे.

नामविस्तार दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान गायकवाड यांनी केले तर आभार एस.जी.गायसमुद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.नामविस्तार दिन कार्यक्रम कृष्णनगर वंदना ग्रुपच्या वतीने करण्यात आले असून याप्रसंगी आर.जी.मस्के,वैजनाथ शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.