

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.14जानेवारी):-मकर संक्रांतीचे औचित्य साधून वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे पारंपारिक वेशभूषा दिन आणि व्यापार मेळावा यांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता, उद्योगशिलता, नवनिर्माण क्षमता, सृजनशीलता, व्यापारविषयक व्यावहारिक दृष्टिकोण निर्माण व्हावा, त्यांच्या व्यापारविषयक कौशल्य गुणांची वाढ व्हावी, सद्यकालीन आर्थिक परिस्थितीमधील आव्हाने पेलता यावीत, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने महाविद्यालयात व्यापारी मेळावा (ट्रेड फेअर) चे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ , सौंदर्य प्रसाधने, कपडे, चप्पल, स्टेशनरी साहित्य, मोबाईल ॲक्सेसरीज, आईस्क्रीम यासोबतच फनी गेमचे फनी गेमचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी व्यापाराच्या अनुभवा सोबतच या फनी गेम्सचा आनंद लुटला.
सदर या मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. अल्ताफहुसेन मुल्ला यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त व सदस्य श्री. अरुण पांडुरंग पाटील (काका) तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत केंगार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. जाधव होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन विद्यार्थ्यांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला तसेच फनी गेम्स मध्येही उस्फूर्तपणे सहभाग घेतला. पारंपारिक वेशभूषेत तरुणाई महाविद्यालय परिसरामध्ये अवतरली होती. यामध्ये केरळा लुंगी, महाराष्ट्रीयन पेहराव तसेच आसामी, काश्मिरी पेहराव मध्ये ही काही तरुणाई दिसून येत होते. अतिशय आनंदी वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व संस्था पदाधिकारी उपस्थित होते.







