Home सामाजिक पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवडणूक भत्त्याची पुनर्रचना करा : किरण खरात

पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवडणूक भत्त्याची पुनर्रचना करा : किरण खरात

133

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(सातारा)(दि.17जानेवारी):-राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद पंचायत समिती ची सार्वत्रिक निवडणुकीची लगबग चालू झाली असून निवडणूक जाहीर झाले पासून पोलीस दलाच्या कामाचा ताण कमालीचा वाढला असून इव्हीम मशीन सुरक्षा , आदर्श आचारसंहिता पालन, उमेदवारी अर्ज प्रक्रिया, प्रचार फेऱ्या मंत्र्यांचे दौरे , स्थिर सर्वेक्षण पथक , फिरते सर्वेक्षण पथक , प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी अशा विविध प्रक्रिया सुरळीत पार पाडणे मध्ये पोलीस कर्मचारी अधिकरी मोलाची भुमीका २४ तास बजावत असतात परंतु या कर्मचाऱ्यांना मिळणार निवडणूक भत्ता हा इतर विभागांच्या तुलनेत फार च कमी असतो याचा परिणाम थेट पोलीस बांधवांच्या मानसिकतेवर होत असतो.

तसेच जिल्हयातील गेल्या अनेक निवडणुकांचे पोलिसांचे भत्ते देखील थकीत असून ते वेळेवर मिळत नाहीत. तरी सध्या पोलिसांना देय असलेले निवडणूक भत्ते हे तुटपुंजे असलेने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये निवडणूक काळा मध्ये सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी यांचं भत्त्याची पुर्नरचना करून सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी याना इतर विभागाप्रमाणे भरघोस निवडणूक भत्ता मिळावा अशी मागणी सातारा पोलीस बॉईज चे वतीने मा. राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे करणेत आली आहे.

सध्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवडणूक काळातील सेवेबद्दल मिळणारा भत्ता हा तुटपुंजा असून निवडणूक आयोगाने इतर विभागाप्रमाणे पोलीस दलास ही भरीव

 निवडणूक भत्ता देणेची भूमिका घ्यावी.

किरण खरात

(पोलीस बॉईज सातारा)