

▪️संस्थापक अध्यक्ष श्री. राजकुमार फासगे सर, श्री.बसवराज कदम सर यांच्या प्रेरणेतून संस्था कार्यरत
✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे,धायरी(दि.6फेब्रुवारी):- एम्स एक्सलेन्स ॲकॅडमी, धायरी येथील या शैक्षणिक, सामाजिक संस्थेने अल्पावधीतच अत्यंत उत्तुंग कामगिरी करत सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याची संधी निर्माण करून दिली आहे. सर्व विद्यार्थी यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री गणेश चाटे सर तसेच अश्विनी मुंडे मॅडम यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक “एम्स एक्सलेन्स ॲकॅडमी” चे संस्थापक श्री. राजकुमार फासगे सर यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार एम्स एक्सलेन्स अकॅडमी चे संस्थापक श्री. बसवराज कदम सर यांच्या हस्ते झाला यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिपक पाटील सर यांनी केले. यावेळी त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मौल्यवान मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, गुणवत्ता कशी वाढवावी, अभ्यासातल्या अडचणी कशा सोडवाव्या यावर मौल्यवान मार्गदर्शन केले व येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व आपले शैक्षणिक अनुभव मांडले ,मनोगत व्यक्त करत असतांना विद्यार्थ्यांनी आपली पुढील शैक्षणिक दिशा काय असेल यावर मत मांडले. यानंतर एम्स एक्सलेब्स अकॅडमी तर्फे सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.या कार्यक्रमासाठी युवानेते श्री. यशवंत बाप्पू लायगुडे खडकवासला विधानसभा मतदारसंघ भा.ज.पा. यांनी सुद्धा हजेरी लावली त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी एम्स एक्सलेन्स अकॅडमी चे संस्थापक श्री बसवराज कदम व श्री राजकुमार फासगे सर तसेच श्री दिपक पाटील सर, श्री अतिष चव्हाण सर सो मनिषा डोळस मॅडम, रश्मी कुलकर्णी मॅडम तसेच अक्षता मॅडम व इतर शिक्षकेतर कर्मचारी, रजिया मावशी ,पवार मावशी मध्ये विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री कदम सर यांनी केले यामध्ये त्यांनी प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्री थोपटे सर यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.







