Home फिल्मी खबर छावा चित्रपटातील कलाकार ‘आशिष पाथोडे’ सोबत रंगल्या गप्पा

छावा चित्रपटातील कलाकार ‘आशिष पाथोडे’ सोबत रंगल्या गप्पा

446

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हापुरी(दि.20मार्च):-नागभीडच्या मातीतून जन्माला आलेल्या कलाकाराने अल्पावधीतच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनयाची छाप

उमटविली. त्या कलाकाराचे नाव आहे ‘आशिष पाथोडे’ पूर्व विदर्भातील या युवा कलाकाराने नागभीड, ब्रम्हपुरी क्षेत्राचे नांव सिनेसृष्टीच्या नकाशात कोरले. अशा कलाकाराचा सत्कार

समारोह व प्रेक्षकांशी हितगुज कार्यक्रमाचे आयोजन ॲड. गोविंद भेंडारकर यांच्या पुढाकाराने स्वागत मंगल कार्यालयात करण्यात आले. छावा चित्रपटाविषयी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होतीच. त्या चित्रपटातील विविध कंगोरे जाणूनघेण्याविषयी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा या जगप्रसिध्द अभिनयाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतून आशिषने पदवी प्राप्त केली. यानंतर त्याने मागे फिरून पाहिले नाही. प्रेक्षकांशी हितगुज साधतांना त्याने सुरूवातीच्या काळातील संघर्षगाथा कथित केली. प्रचंड मेहनत, आत्मविश्वास व अभिनय कौशल्याच्या आधारावर त्याने सिनेसृष्टीत स्थान निर्माण केले. छावा चित्रपटातील ‘अंताजी’च्या भूमिकेत तो प्रेक्षकांना दिसला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘टपाल’ या मराठी चित्रपटात महत्वाची भूमिका वठवली. अभिनयच नव्हे तर चित्रपटातील कलाकारांना संवाद कौशल्याचे प्रशिक्षणदेण्याच्या कार्यात तो निपूण आहे.

‘तानाजी’ या चित्रपटात अजय देवगण व सैफ अली खान तसेच छावा या सिनेमात विकी कौशलला संवाद कौशल्याचे प्रशिक्षण आशिष पाथोडे यांनी दिले. दीपक सेमस्कर यांनी आशिष पाथोडेची प्रकट मुलाखत घेतली. यामध्ये पाथोडेने प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांना रोचक उत्तरे देऊन त्यांना रिझविले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट व भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदस्य डॉ. विवेक शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी अँड. गोविंद भेंडारकर, डॉ. एन. एस. कोकोडे, जेष्ठ पत्रकार प्रा. विजय मुडे, सुप्रसिध्द व्यापारी इकबाल जेसानी, डॉ. खिजेंद्र गेडाम, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, शिवछत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष मोंटू पिलारे, पोलीस निरिक्षक प्रमोद बानबले, व्यासपीठावर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिवछत्रपती फाऊंडेशन, सांझविहार अकॅडमीचे जगदीश गोमीला, संभाजी ब्रिगेडचे सुरज तलमले, जनमंच प्रा. तेजस गायधने, तथा पी. आर. डी. स्पोर्टचे राहुल जुआरे यांचे सहकार्य लाभले. इत्यादी उपस्थित होते.