Home महाराष्ट्र श्री संत जनाबाई महाविद्यालयात सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्राम प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

श्री संत जनाबाई महाविद्यालयात सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्राम प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

165

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.24मार्च):- श्री संत जनाबाई महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पीएम उषा या योजने अंतर्गत सॉफ्ट स्किल कोर्स घेणात आला होता. या मध्ये 162 विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला.सॉफ्ट स्कील ट्रेनिंग प्रोग्राम प्रमाणपत्र वितरण सोहळा (दि.23 मार्च रविवार) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जनाबाई शिक्षण संस्था सहसचिव दशरथ चौधरी,डॉ.ज्योती सिंग,व्हरचू अकॅडमी,नाशिक.डॉ.निलेश बेराड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.धूत, उपप्राचार्य-डॉ.चंद्रकांत सातपुते व पी.एम.उषा संयोजक डॉ.संजीव कुमार क्षीरसागर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. सचिन कलमे,सूत्र संचलन प्रा.कैलास गिरी व आभार प्रा.अमोल करपे यांनी मानले. कु.ऋतुजा खोडके, कु.अरुणा बेले इत्यादी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.