Home चंद्रपूर स्व. सुखराम नारायण कांबळे यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ वॉटर कुलिंग मशीन भेट

स्व. सुखराम नारायण कांबळे यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ वॉटर कुलिंग मशीन भेट

101

▪️विदेही श्री सदगुरू जगन्नाथ बाबा देवस्थानला दिली थंड पाण्याची मशीन भेट.

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.१२एप्रिल):-बबिता सुखराम कांबळे , राजुरा तालुका महिला संघटीका, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांचे वडील स्वर्गीय सुखराम नारायण कांबळे यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ राजुरा येथील साई नगर वार्डातील विदेही श्री सदगुरू जगन्नाथ बाबा देवस्थान ला वॉटर कुलिंग मशीन भेट देण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अरुणभाऊ धोटे, नगराध्यक्ष, न.प. राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून दिलीपभाऊ देरकर, उप नगराध्यक्ष, न.प. राजुरा ,अनंता ताजने,सभापती, न.प. राजुरा, अन्नुकौर संधू, सभापती, न.प. राजुरा, संध्या चांदेकर, नगरसेविका, प्रभाग क्रमांक ९ (अ) न.प. राजुरा, हरजीतसिंग संधू, माजी नगरसेवक तथा शहर अध्यक्ष, काँग्रेस , यादव कुळमेथे, बबिता सुखराम कांबळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मेघा धोटे, नागपूर विभाग महिला सचिव यांनी केले. प्रास्ताविक बादल एन. बेले ,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी केले तर आभार सुनैना तांबेकर, नागपूर विभाग महिला अध्यक्षा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर , चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र देशकर , वन्यजीव संवर्धन समितीचे विलास कुंदोजवार ,अरुणा बुटले , भास्कर करमरकर ,रवी बुटले, प्रतीक काकडे, अभय बोबाटे आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी मसालेभात, मठ्ठा, जिलेबी वितरित करण्यात आली.

——————————————–

*अरुण धोटे, नगरध्यक्ष, न.प.राजुरा* 

       सर्वात मोठे दान पाण्याचे असून “मरावे परी किर्तीरुपी उरावे” या उक्ती प्रमाणे स्व.सुखराम कांबळे यांच्या पहिल्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या मुलीने वॉटर कुलिंग मशीन ही जगन्नाथ बाबा देवस्थानाला भेट दिली हे कौतुकास्पद बाब आहे. बरेचदा संपत्ती असूनही त्याचा योग्य वापर न करता चिंतेत जीवन जगणारे लोक बघताना वेदना होतात. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, मानवता विकास, गरजूंना मदत, शैक्षणिक साहित्य वाटप असे समाजपयोगी उपक्रम कार्यक्रम राबवून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आपले कर्तव्य हे बजावत आहे असे प्रतिपादन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले.

——————————————–

*दिलीप देरकर, उप नगराध्यक्ष, न.प. राजुरा*

         नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कार्याने आम्ही प्रभावित होऊन राजुरा नगर परिषद क्षेत्राला स्वच्छ, सुंदर करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्याकरिता नेफडो संस्थेचे सहकार्य भविष्यातही आम्ही घेत राहू. कांबळे कुटुंबियांच्या या दानशूरपनामुळे येथील भक्तांना थंड पाण्याचे पाणी मिळणार आहे. बबिता कांबळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ वॉटर कुलिंग मशीन देवस्थानाला दान देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला याचे कौतुक दिलीप देरकर यांनी केले.