Home चंद्रपूर ब्रम्हपुरी पब्लिक स्कुल ब्रह्मपुरी चे सुयश 

ब्रम्हपुरी पब्लिक स्कुल ब्रह्मपुरी चे सुयश 

109

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.13मे):- नुकत्याच वर्ग दाहावीच्या CBSE बोर्ड च्या घोषित झालेल्या निकालामध्ये ब्रम्हपुरी पब्लिक स्कुल ब्रह्मपुरी येथील कु. स्पर्शिका सचिन खोब्रागडे – 93% घेऊन विद्यालयात प्रथम आली.

कु. संचिता महेंद्र रामटेके 89.80% गुण घेऊन द्वितीय आणि कु. सायली विनोद गजभिये ही 85.6% घेऊन तृतीय आली. शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून, संस्थेचे सचिव डॉ.देवेश जी कांबळे तथा संचालक मंडळाचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापिका रीमा कांबळे ,पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.