Home महाराष्ट्र १ जून, सरकारी कर्मचाऱ्यांचा निषेध दिवस!

१ जून, सरकारी कर्मचाऱ्यांचा निषेध दिवस!

244

जबाबदारीची जाणीव व्हावी किंवा कतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी वर्षातील एक दिवस स्मरण दिवस निश्चित केले आहेत. तसाच मी सरकारी कर्मचाऱ्यांचा निषेध दिवस निश्चित करीत आहे.

      सरकारी कार्यालयातील कामे करावी याच उद्देशाने सरकार नोकरांना कामावर ठेवते. त्यांची शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता परीक्षा घेऊन पद देते. या नोकरांना लठ्ठ पगार व इतर भत्ते दिले जातात. कोठून येतो हा पैसा? नागरिकांच्या करातूनच. बळजबरीने, सक्तीने, मर्यादित वेळेत वसूल केला जातो. तर मग कामे सुद्धा मर्यादित वेळेतच झाली पाहिजे. पण तसे होत नाहीत. नागरिक वारंवार चकरा मारतात आणि सरकारी नोकर बहाणे बाजी करून टाळाटाळ करतात. त्यांचा पगार वेळेवर झाला नाही किंवा झालाच नाही तर आंदोलन, मोर्चा काढतात. का पाहिजे पगार? जर काम करीतच नसतील तर! पण हे सरकार तरीही कामचोर, लांचखोर नोकरांना पाठीशी घालते. अनावश्यक संरक्षण देते.नागरिकांवर गुन्हा दाखल करते. सरकारी कामात अडथळा आणणे, खंडणीची मागणी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे वगैरे. पोलिस आणि न्यायाधीश सुद्धा असे खोटे आरोपांना खरे समजून कामचोर आणि लांचखोर नोकरांना जावईची वागणूक देतात. त्यामुळे सरकारी नोकरांना फावते. ते जास्त प्रमाणात कामचोरी करतात. नागरिकांना वेठीस धरतात.

   हे सर्व एकतर्फी आणि चुकीचे आहे. नागरिकांवर अन्याय करणारे आहे. नोकर सरकारचा असला तरीही पगाराचा पैसा तर नागरिकच देतात. तर मग नागरिकांचे निहीत, विहीत काम का करीत नाहीत?असा प्रश्न पोलिस करीत नाही. न्यायाधिश करीत नाहीत. आमदार खासदार मंत्री करीत नाहीत. तर मग नागरिकांनी दाद कोणाकडे मागावी? तो हतबल होतो. चुकीचे पाऊल उचलतो. आत्महत्या करतो.

       मला सरकारी नोकरांचा कामचुकारपणाचा दिर्घ अनुभव आहे. मला वाटते, सरकारी नोकरांच्या काम चोरी विरोधात तक्रार करण्याचे कुठेही व्यासपीठ नाही. नोकरांच्या वरिष्ठ कडे तक्रार केली तर हा लांडगा आणि तो कोल्हा असतो. आणखी वरिष्ठ कडे केली तर तो बिबट्या असतो. आणखी वरिष्ठ कडे केली तर तो वाघ असतो. आमदार, खासदार, मंत्री मंत्री कडे केली तर तो नरभक्षक तडस असतो. आतापर्यंत एकाही मंत्री ने कामचोर नोकरांवर कारवाई केली नाही. तर मग तक्रार करावी कोणाकडे? काठी घेऊन नोकरांना मारता येत नाही. चाकू, पिस्तूल घेऊन खून करता येत नाही. हा हिंसक मार्ग म्हणजे कामचोरी वर उपाय नाही.

    म्हणून मी ठरवले कि, सरकारी नोकरांच्या काम चोरी विरोधात जाहीर निषेध दिवस पाळला पाहिजे. जेणेकरून नोकरांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तस्वकीयांना वाटले पाहिजे, कि पगार घेऊन काम न करणारा नोकर बदमाष आहे. हरामखोर आहे. त्याची निर्भत्सना केली पाहिजे. त्याचा तिरस्कार केला पाहिजे. त्याचा निषेध केला पाहिजे.

   म्हणून माझा वाढदिवस १ जून, सरकारी नोकरांचा निषेध दिवस निश्चित करीत आहे. जो जो नागरिक कामचोर नोकरांमुळे हैराण असेल त्यांनी कामचोर नोकरांचा जाहिर निषेध करावा. काम न करता फुकट घेतलेला पगार म्हणजे हरामखोरी आहे, याची जाणीव करून द्यावी.

      सरकारी नोकर काम चोरी आणि लांच खोरीने बरबटलेले आहेत. आमदार, खासदार मंत्री या काम चोरांवर वचक ठेवण्यासाठी सक्षम नाहीत. या कामचोरीची जाहीर वाच्यता करता यावी, या हेतूने आम्ही हे पाऊल उचलत आहोत.

      ज्यांना माझी संकल्पना योग्य वाटत असेल त्यांनी कामचोर सरकारी नोकरांचे “प्रतिमा चित्र “मला पाठवावे. त्यातून सर्वाधिक योग्य ते निवडून लोगो म्हणून वापर करण्यात येईल. दरवर्षी त्याचा निषेध करण्यात येईल. सैतानाची टेकडी, चप्पलची मजार याप्रमाणे काम चोर नोकर असा निषेधात्मक संकेत देणे आवश्यक आहे.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२