Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी कोरोना आजारामुळे तिघांचे मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी कोरोना आजारामुळे तिघांचे मृत्यू

134

?आज दि.31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.15 वाजेपर्यंत 203 नवीन कोरोना बाधीत

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि 31ऑगस्ट):-जिल्ह्यात कोरोना आजारामुळे दिवसागणिक मृत्यू होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात तिघांचा मृत्यू झाला आहे. यात चंद्रपूर येथील बाबूपेठ वार्डातील 55 वर्षीय पुरुष बाधिताला 22 ऑगस्टला भर्ती करण्यात आले होते. त्याचा 30 ऑगस्टला शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. तर उर्जा नगर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताला 30 ऑगस्टला भर्ती करण्यात आले होते.त्याचा 30 ऑगस्टला सायंकाळी मृत्यू झाला, तसेच गांधी वार्ड बल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुष बधितांचा अहवाल 30 ऑगस्टला पोसिटीव्ह आला त्याचा उपचारादरम्यान शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला.

आज दि.31 ऑगस्ट सायंकाळी 7.15 वाजेपर्यंत 203 कोरोना बाधितांची भर पडली आहे.