Home महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या जीवन चरिञापासून प्रेरणा घेऊन स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास करावा :...

विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या जीवन चरिञापासून प्रेरणा घेऊन स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास करावा : सुरेश मंत्री

273

✒️अंबाजोगाई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अंबाजोगाई(दि.1ऑगस्ट):- विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या जीवन चरिञापासून प्रेरणा घेऊन स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास करावा असे प्रतिपादन स्तंभ लेखक सुरेश मंत्री यांनी केले. देवळा येथील विश्वरुपी माध्यमिक विद्यालयात आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक खोसे एस. जे तर प्रमुख पाहुणे म्हणून भरत महाराज खामकर, रविंद्र देवरवाडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुरेश मंत्री म्हणाले की, अण्णाभाऊ साठे, लोकमान्य बाळ टिळक यासारख्या महापुरुषांनी मानवजातीच्या कल्याणासाठी आपले आयुष्य पणाला लावले.

आपण केवळ यांच्या जीवनचरिञास उजाळा देवून चालणार नाही तर त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी जो जीवन संघर्ष केला त्यातून धडा घेऊन आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करून पर्यायाने देशाचा विकास करावा. यावेळी खोसे एस. जे, भरत महाराज खामकर, रविंद्र देवरवाडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अक्षरा आगळे तर सुञसंचलन कु. स्नेहल गायकवाड व कु. ऋतुजा कदम यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार कु. आरती साळुंके हिने मानले. या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.