Home चंद्रपूर प्रदूषणमुक्त व पर्यावरणयुक्त अशी दिवाळी साजरी करा- सतीश धोटे 

प्रदूषणमुक्त व पर्यावरणयुक्त अशी दिवाळी साजरी करा- सतीश धोटे 

130

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

▪️आदर्श शाळेत वाचन प्रेरणा दिन व राष्ट्रीय हात धुवा दिन कार्यक्रम संपन्न

राजुरा(दि.१५ऑक्टोबर):-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्याने वाचन प्रेरणा दिन व राष्ट्रीय हात धुवा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतीश धोटे, अध्यक्ष, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भास्करराव येसेकर, सचिव, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, नलिनी पिंगे,मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक, सारीपुत्र जांभूळकर,मुख्याध्यापक, आदर्श हायस्कूल राजुरा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच वाचन प्रेरणा दिन निमित्ताने पुस्तक वाचन करण्यात आले. दिपोत्सव निमित्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश धोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले दिपोत्सव हा प्रदूषण मुक्त व पर्यावरण युक्त साजरा करावा. फटाके न फोडता गरजू गरिबांना आपण मदत करावी.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कल्लुरवार यांनी केले व आभार सुनिता कोरडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय हरित सेना,इको क्लब ,स्काऊट गाईड ,कब बुलबुल विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. दिपोत्सव सजावट उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अत्यंत आकर्षक असे दीप सजावट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.