Home चंद्रपूर बापुनगर आदिवासी कोलाम गुड्यावर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दिपोत्सव...

बापुनगर आदिवासी कोलाम गुड्यावर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दिपोत्सव उपक्रम संपन्न

196

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428)

 ▪️गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्य हीच दीपोत्सवाची खरी फलश्रुती.- व्यंकटराव टप्पे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार 

▪️पर्यावरण व मानवता विकासातील योगदानाबद्दल केला दोन मान्यवरांचा सत्कार

राजुरा(दि.22ऑक्टोबर):- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे गेल्या आठ वर्षापासून सातत्याने आदिवासी कोलाम गुड्यांवर दीपोत्सव हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. विरुर स्टेशन परिसरातील बापुनगर आदिवासी कोलाम गुड्यावर हा दिपोत्सव उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटराव टप्पे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी, नेफडो यांची उपस्थिती होती. तर सत्कारमूर्ती म्हणून परवीन कपिल बोरावार – पठाण ,उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा महिला निफडो , विशाल नानाजी पारखी ,आदर्श सरपंच ग्रामपंचायत दहेगाव तथा तालुका अध्यक्ष वरोरा नेफडो , प्रमुख अतिथी म्हणून रजनी शर्मा, विजयकुमार जांभुळकर , मिलिंद गड्डमवार , उषा टोंगे , किरण हेडाऊ , श्रीरंग ढोबळे, शंकरराव बुऱ्हान , सुनिता उगदे , मंदा सातपुते , माधुरी कुळकर्णी , अरुणा बुटले, पुष्पा मेश्राम, गाव पाटील जनमा सीडाम , प्रतिष्ठित नागरिक संतोष बानोत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामदेवतेचे पूजन करण्यात आले.

तसेच मानवता विकास अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चंद्रपूर च्या पहिल्या महिला वाहतूक पोलिस तसेच सायबर क्राइम विषयावर जनजागृती करणाऱ्या मुल येथे कार्यरत महिला पोलिस कर्मचारी परवीन बोरावार – पठाण यांचा व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ग्रामपंचायत दहेगाव चे सरपंच विशाल पारखी यांचा शॉल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी बापुनगर येथील पंचेवीस कुटुंबांना ब्लँकेट, टॉवेल,साड्या,धोतर, लुगडे, मुलामुलींना कपडे, पेनी, एक्झाम पॅड, डेटॉल साबण, फराळाचे साहित्य, साखर अशी किट वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधा दोरखंडे यांनी केले तर प्रास्ताविक मोहनदास मेश्राम यांनी केले. आभार बादल बेले यांनी मानले. यावेळी बापुनगर येथील आदिवासी बांधवांनी भुसाळी नृत्य व लोकनृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना व्यंकटराव टप्पे म्हणाले गरजू लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच खरे समाधान असून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या दीपोत्सवाची खरी फलश्रुती आहे.

नियमितपणे केवळ आदिवासी कोलाम गुड्यावर हा उपक्रम राबविण्यात येतो .कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला नवीन कपडे व इतर आवश्यक साहित्य वितरित करून दिपोत्सव उपक्रम राबविण्यात येतो याचेही त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजुरा, गडचांदुर, बल्लारपूर, चंद्रपूर येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी सर्वांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला. 

———————————————

सकारमूर्ती परवीन कपिल बोरावार – पठाण 

                     आर्थिक परिस्थिती ही कधीही प्रगती थांबवू शकत नाही. नियमितपणे अभ्यास ,जिद्द, चिकाटी, परिश्रम, कामातील प्रामाणिकपणा व सातत्य असल्यास बदल नक्कीच घडू शकतो. दिपोत्सव उपक्रम पहिल्यांदा अनुभवताना अतिशय आनंद झाला. सायबर गुन्हेगारी व फसवणुकीपासून स्वतः बचाव करण्यासाठी सतर्क असणे, जागरूक असणे व फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करावी. तसेच चुकीच्या लिंक, ओ.टी.पी. नंबर शेअर करू नये. जल, जंगल, पशू, पक्षी, वृक्ष, पर्यावरण यांचे रक्षण करणे हे सुद्धा आपले कर्तव्य असल्याचे मत परवीन बोरावार -पठाण यांनी व्यक्त केले.

———————————————

सत्कारमूर्ती विशाल नानाजी पारखी, सरपंच, ग्रामपंचायत, दहेगाव ता. वरोरा 

            ग्राम पंचायत दहेगाव येथे स्मशान भूमी व परिसरात जवळपास दहा हजाराच्या वर वृक्षांची लागवड करण्यात आली. कर वसुलीकरिता लोकसहभागाच्या नाविण्यपूर्ण योजना राबवून ग्रामपंचायत आर्थिदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केलाय, गाव सिसी टीव्ही च्या निगराणीत, ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी ISO नामांकन प्राप्त, दारूमुक्त गाव, लोकसहभागातून नाविण्यपूर्ण उपक्रम, शासनाच्या विविध योजनाचा राबविण्यात आल्या व गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरू आहे. दिपोत्सव उपक्रमातून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत लोककल्याचे उपक्रम राबविले. पर्यावरण संवर्धन व मानवता विकास करीता ही संस्था सातत्याने उपक्रम कार्यक्रम राबवित असते असे मत सरपंच विशाल पारखी यांनी व्यक्त केले.