

▪️”रन फॉर युनिटी” मधे शालेय विद्यार्थी, सामाजिक संघटना व पोलिस विभागाचा सक्रिय सहभाग
▪️पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपण तसेच शस्त्रांची दिली माहिती
✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.३१ऑक्टोबर):-स्वातंत्र्योत्तर काळातील भारताचे पहिले गृहमंत्री व उपप्रधानमंत्री, ‘लोहपुरुष’ भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने प्राप्त पत्रान्वये राजुरा पोलिस स्टेशन च्या वतीने “रन फॉर युनिटी” अंतर्गत पंचायत समिती संविधान चौक ते पोलिस स्टेशन राजुरा पर्यंत वॉक चे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी आठ वाजता हिरवा झेंडा दाखवून वॉक ची सुरुवात केली. यामध्ये शहरातील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा चे विद्यार्थी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, ॲड.यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा चे शिक्षक व विद्यार्थी, पोलिस भरती सराव करणारे युवक युवती, धावपटू, पोलिस अधिकारी – कर्मचारी, बालक आणि नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग राजुरा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.
यावेळी पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांनी उपस्थितांना सद्भावना दिवसानिमित्त मार्गदर्शन केले. या वॉक मध्ये पोलिस स्टेशन राजुरा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार,पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार व गोपनीय अंमलदार संघपाल गेडाम , बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था , मोहनदास मेश्राम, अनंत डोंगे, नरेंद्र देशकर, संतोष चंदनखेडे, विलास कुंदोजवार तसेच पुरुष व महिला पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते. या उपक्रमातून राष्ट्रीय एकता, बंधुता आणि सद्भावनेचा संदेश देण्यात आला.
यावेळी पोलिस विभागामार्फत शस्त्रांची माहिती देण्यात आली. नशामुक्त अभियाना चे वेगवेगळे संदेश देण्यात आले तसेच पोलिस स्टेशन राजुरा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.







