

▪️शेकडो उपासक उपासकांनी घेतला भोजनाचा स्वाद..!
✒️सिद्धार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)
उमरखेड(दि.11ऑक्टोंबर):- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील सम्यक बुद्ध विहार येथे वर्षावास समाप्ती आणि कोजागिरी पौर्णिमानिमित्त भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आला.
मागील अश्विन पौर्णिमा ते आषाढ पौर्णिमेपर्यंत या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सतत वाचन उपासिका इंगोले तसेच भंते कीर्तीबोधी यांनी केले. याचाच समारोप म्हणून वार्डातील सर्व उपसकांच्या आर्थिक दानातून हा भोजनदानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न संपन्न करण्यात आला. या भोजनदानाच्या कार्यक्रमाला शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन भोजनाचा स्वाद घेतला होता.
तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीच्या वतीने रांगोळी स्पर्धा आणि डान्स स्पर्धेतील एकूण 18 स्पर्धकांना पेन,पॅड, कम्पॉस तसचे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दानशूर सामाजिक कार्यकर्ते गोपालभाऊ अग्रवाल यांच्या हस्ते सुद्धा प्रत्येक स्पर्धकाला शंभर रुपये प्रमाणे बक्षीस देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिराबाई दिवेकर, रेखाताई भरणे, प्रमोदिनी किनाके आगार प्रमुख, गजानन रासकर, गोस्वामी,उज्वलाताई जनार्धन साळवे,ज्योती प्रकाश मोटघरे, छायाताई भालेराव, बबलू भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रफुल दिवेकर, सम्यक बुद्ध विहार समिती अध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर, उत्सव समिती अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तुषार पाईकराव संतोष इंगोले, गौतम दिवेकर, रमामाता महिला मंडळ अध्यक्षा उषाताई इंगोले, बेबाबाई गवंदे, भारती केंद्रेकर, संघमित्रा केंद्रेकर, आकाश श्रवले,किरण पाईकराव,योगेश दिवेकर,तानेज पाईकराव, आकाश पाईकराव,नितीन आठवले, सर्व तरुण मंडळ इत्यादी अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथांग परिश्रम घेतले.







