

✒️विशेष प्रतिनिधी(जगदीप वनशिव)
सासवड(दि.12ऑक्टोबर):- येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित १८ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. अशी माहिती संमेलनांचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या कऱ्हा नदीच्या काठावरील खानवडी येथे दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनाच्या संयोजन बैठकीला मराठा महासंघ पश्चीम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप, साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धीवार, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, रमेश बोरावके, दत्तात्रय होले, दत्तात्रय कड, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, सचिव दीपक पवार, प्रसिध्दी प्रमुख अमोल भोसले, बदाम अण्णा माकर, गंगाराम जाधव, प्रफुल्ल देशमुख, छायाताई नानगुडे, सचिन होले, विजय होले, योगेश रासकर, पत्रकार रानकवी जगदीप वनशिव गणेश होले, संतोष डूबल, सनी चव्हाण, किशोर झुरंगे, कैलास धीवर, शिवाजी झुरंगे आदी उपस्थित होते.
या संमेलनात राज्यभऱातून दरवर्षी मोठ्या संख्येने लेखक, कवी, कलावंत सहभागी होतात. सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो. 9881098481 8888410330 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दशरथ यादव यांनी केले आहे.







