Home महाराष्ट्र रिपाई जावली तालुक्यात सर्व जागा लढवणार : एकनाथ रोकडे

रिपाई जावली तालुक्यात सर्व जागा लढवणार : एकनाथ रोकडे

171

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

 म्हसवड(सातारा)(दि.14ऑक्टोबर):-येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषदच्या तीन व पंचायत समितीच्या सहा सदस्यपदाच्या सर्व च्या सर्व जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ )लढवणार असून आंबेडकरी संघटनेला जावली तालुक्यात आपले अस्तित्व अबाधित राखायचे असेल तर निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन रिपाई पक्षाची ताकद दाखवून देऊन बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासनकर्ती जमात व्हावी लागेल.

      जावली तालुक्यामध्ये आंबेडकरी संघटनेचे मतदान प्रत्येक गटात आणि गणात निर्णायक असून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये रिपाई चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आंबेडकरी संघटनेची एकत्र मुठ बांधून ओबीसी,एससी, एसटी व बहुजन समाजातील वंचित घटकांना एकत्र करून रिपाई पक्षाच्या *ऊस शेतकरी* या चिन्हावर निवडणूक लढऊन जास्तीत जास्त तरुणांना नेतृत्व करण्याची संधी देणार अशी माहिती रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी दिली.

      तसेच ओबीसीच्या ज्या राखीव जागा आहेत त्या जागेवर फक्त उच्च शिक्षित ओबीसीचे उमेदवार उभे करून त्यांना आंबेडकरी संघटना ताकतीने पाठबळ देऊन निवडून आणनार आहे.

     मागासवर्गीय वंचित, शोषित घटकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एस सी प्रवर्गाची 2011 सालची जनगणना गावपुडाऱ्यांनी घरात बसून चुकीची केली व चुकीची लोकसंख्या लावल्यामुळे पंचायत समिती चे हक्काचे आरक्षण गेले व त्यामुळे गेले तीस वर्ष जावली तालुक्यातील आंबेडकरी समाज सत्तेपासून वंचित राहिलेला असून मागासवर्गीय समाज्याला जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर ठेवण्याचे पाप स्थानिक तत्कालीन पुढाऱ्यानीं केले आहे

       तसेच ओबीसी समाजालाही सत्तेपासून डावलण्यासाठी त्यांच्या आरक्षित जागेवर खुला प्रवर्गाची जागा कुणबी म्हणून ही उभे करण्याचे कारस्थान काही जातीवादी पुढारी करत असून आरक्षित जागेवर कोण चुकीचा जातीचा दाखला लावून उभे राहत असेल तर त्या उमेदवाराला आंबेडकरी संघटना तसेच ओबीसी समाज,माळी, साळी, कोळी, सुतार अशा आठरा पगड जाती बलुती समाज मतदान करणार नाही प्रसंगी त्या उमेदवाराच्या विरोधात मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय लवकरच सर्व समाज्याच्या वतीने घेन्यात येईल.

      जोपर्यंत ओबीसी ची जनगणना होत नाही तोपर्यंत त्या जागेवर 2011 च्या जनगणनेनुसार फक्त ओबीसी समाजाचा उमेदवार उभा केला जाईल अशाच पक्षांना या ठिकाणी पाठिंबा दिला जाईल अन्यथा जावली तालुक्यातील सर्व ओबीसी एससी एसटी एनटी तसेच इतर मागास प्रवर्गातील सर्व लोक अशा उमेदवाराला मतदान करणार नाहीत अशा उमेदवाराच्या विरोधात मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला जाईल असा इशारा रिपाई चे जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे, भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालूका अध्यक्ष संतोष खरात, दशरथ कांबळे, संतोष चव्हाण, नितीन जाधव, विशाल सकपाळ, मोहन कांबळे, दत्तात्रय जाधव,डॉ मिलिंद गायकवाड, राजेश बगाडे , रेश्मा ताई खरात, विजय गंगावणे इत्यादी रिपाईच्या सर्व कोर कमिटी, भारतीय बौद्ध महासभा जावली तालूका व तत्सम समविचारी संघटना यांनी दिलेला आहे.

       तसेच ओबीसी बुद्धिस्ट सर्व समविचारी संघटनांची बैठक घेऊन सर्व बहुजनांनी एकत्र घेऊन तालुक्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ताकतीने उतरण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला.