

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.20ऑक्टोबर):- तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना गंगाखेड महसूल प्रशासनाच्या वतीने दिवाळी सनानिमित्त साडी,चोळी,फराळ व दिवाळी संबंधित गोड वस्तूची भेट देण्यात आली.तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये (दिनांक 18 ऑक्टोबर रविवार) रोजी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्या संकल्पनेमधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सणासुदीचे दिवस असल्याने दिवाळी निमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आपले काही देणे लागते या उदात हेतुने उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी संबंधित गोड वस्तूंचे वाटप करण्यात आले.सदरील कार्यक्रमांमध्ये सन 2019 ते 2024 सलामध्ये आत्महत्या केलेल्या गंगाखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त 27 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना बोलवीण्यात आले होते त्यापैकी 25 शेतकरी कुटुंबीय उपस्थित होते तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी आपुलकीने विचारपूस करत उपस्थित महिलांशी संवाद साधला यावेळी उपस्थित महिलांना आपले अश्रू अनावर झाले होते.
उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिले प्रशासनाने आपली दखल घेतल्याबद्दल उपस्थित शेतकरी कुटुंबीयांना दिलासा मिळाला. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड तालुक्यामध्ये चांगला स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला
तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला.कार्यक्रमास नायब तहसीलदार,अशोक केंद्रे,नायब तहसीलदार मोहम्मद अजीम,नायब तहसीलदार प्रीतम डोडल,महसूल सहाय्यक प्रियंका गायकवाड,पेशकार वैजनाथ फड,सहाय्यक महसूल अधिकारी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सहाय्यक शिपाई महसूल सेवक,पत्रकार बांधवांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले







