

सरकार म्हणजे मंत्री मंडळ. त्यांचे अधिन खाते. खात्यातील निर्धारित काम. ते काम करण्यासाठी नोकर. आता हेच नोकर त्याला सोपवलेले निर्धारित काम करीत नसतील तर सरकार ठप्प होते. ते चालावे, ठप्प होऊ नये म्हणून त्या खात्याचा मंत्री जबाबदार असतो. जसे जलसंपदा विभागासाठी गिरीश महाजन जबाबदार आहेत.
जलसंपदा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सर्वाधिक भ्रष्टाचार करतात.जास्त निधी हजम करतात. जनतेला कळतही नाही कि कुठे किती निधी गायब केला.म्हणून अजित पवार सत्तर हजार कोटींची मजल मारू शकले. ते याच नोकरांच्या माध्यमातून. हेच नोकर आता गिरीश महाजन कडे आहेत. तर ते आता सुधारले असतील का? ते आता प्रामाणिक काम करीत असतील का?शक्यच नाही. मी अनुभव घेऊन बोलतो, लिहीतो. जर मला हे कळले तर गिरीश महाजन यांना कळले नसेल का? नसेल कळले तर मी सांगितले तेंव्हा तरी कळले पाहिजे. तरीही कळत नसेल तर त्यांचा मंत्री म्हणून उपयोग काय?
सरकारी नोकर हे वरकरणी वाटतात कि पगारासाठी नोकरी करतात.पण वास्तवात तसे नाही. हे भ्रष्टाचार करण्यासाठी नोकरी करतात. आणि मंत्री सांगतो म्हणून भ्रष्टाचार करतात. त्या चोरीतून ५० टक्के अधिकारी वाटून घेतात. आणि ५० टक्के मंत्री घेतो. घेतोच. त्या शिवाय अजित पवार कडे सत्तर कोटी जमलेच नसते. ते आता गिरीश महाजन कडे जमा होत आहेत. याचा हिशोब अजून कोणी घेतला नाही. याचा हिशोब घेण्याचे धाडस कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या आमदारांमधे नाही. कारण जेंव्हा यांचे सरकार होते तेव्हा यांचे मंत्री आणि आमदार मंडपात जेवत होते. आणि महाजन आणि मंडळी मंडपातून बाहेर फेकलेले उचलत होते. आता महाजन आणि मंत्री मंडळ मंडपात ओरपत आहेत. आणि हे कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आमदार मंडपाच्या बाहेर खांबाला धरून लाळ गाळत आहेत. महाजन यांच्या पानात काही उरले आणि फेकले तर आपण वेचून खाऊ.म्हणून ते चूप आहेत.
एकनाथ खडसे हे या गिरीश महाजन विरोधात का बोलतात?कारण यांचे मंत्री पद महाजन मुळे काढून घेतले आहे म्हणून. ते जनतेच्या हितासाठी बोलत नाहीत. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद फडणवीस यांनी हिसकावून घेतले म्हणून ते त्यासाठी रडत आहेत. जनतेच्या हितासाठी काहीच करीत नाहीत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गुलाबराव पाटील यांनी कोरोना औषधी आणि यंत्रसामुग्री मधे चारशे कोटीचा अपहार केला. कागदोपत्री पुरावे उद्धव ठाकरेंना दिले. पण ठाकरे चकार शब्द बोलले नाहीत. कारण गुलाबराव कडून ठाकरेंना हिस्सा दिला जात असावा. त्याशिवाय ठाकरे चूप बसले नसते. अडिच वर्षांनंतर गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना दगा दिला. शिंदे सोबत पळून गेले. तेंव्हा ठाकरे त्यांना गद्दार गद्दार म्हणून ओरडत होते. जेंव्हा मुख्यमंत्री पद गेले तेंव्हा ठाकरेंना राग आला. भ्रष्टाचार केला तेव्हा ठाकरेंना गुलाबरावचा राग आला नाही.
आम्ही जळगावचे लोकांनी गुलाबराव विरोधात कलेक्टर कार्यालयसमोर उपोषण सुरू केले. जेंव्हा आदित्य ठाकरे जळगाव दौरा करीत होते. हे आदित्य महाशय आकाशवाणी चौकात महिलांमधे लुडबुड, चुळबुळ करीत होते. काही शिवसैनिकांनी आदित्यला निरोप दिला. इकडे चार पावले येऊन भेट द्या. पण आदित्य बाळ महिलांमधे रमले होते. ही टिका नाही.वास्तव आहे. यांचे रडणे, लढणे मतलबा पुरते असते. आहेच.
हा मंडपात जेवणाचा प्रकार बुद्धीबळाचा खेळ आहे. कधी पांढरी सोंगटी जिंकते तर कधी काळी सोंगटी जिंकते. कधी पांढरे चोर मंडपात जेवतात तर कधी काळे चोर मंडपात जेवतात. यात जनतेचे म्हणजे मतदारांचे हित पाहिले जात नाही.
आता अमळनेर तालुक्यातील सात्री गावाचे पुनर्वसन हा विषय आजचा नाही.हा आघाडी सरकार नंतर महाआघाडी सरकार असताना सुद्धा असाच लोंबकळत ठेवला होता. त्यामळे आधी कांग्रेस चे मुख्यमंत्री, कांग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री, शिवसेनेचे मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेतच. फडणवीस आणि महाजन आता लक्ष देत नाहीत. पण मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केले?काहीच केले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अमळनेर चे आमदार सत्ताधारी होते. नंतर शिंदे मुख्यमंत्री असतांना हेच अमळनेरचे आमदार अनिल पाटील पुनर्वसन मंत्री होते.तर मग हे पुनर्वसन का केले नाही? त्यांना करायचे नव्हते आणि नाहीच. उलट अनिल पाटील यांनीच लेखी पत्र देऊन ते थांबवले आहे.हे आता लपून राहिलेले नाही.तर मग कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आमदार का लक्ष देत नाहीत? यांना आमदाराचे मानधन मिळत नाही का?यांना निधी मिळत नाही का? यांना कामाचे मक्ते मिळत नाहीत का?सर्वच मंत्री आणि आमदार माल मलिदा लाटत आहेत.फरक इतकाच युती वाले मंडपात बसून जेवत आहेत आणि आघाडी वाले मनपाच्या बाहेर फेकलेले उष्टे खात आहेत.
आणखी चार वर्षांनी आघाडी वाले मंडपात जेवतील आणि युती वाले फेकलेल्या उष्टे पानातून वेचून खातील.
मला सुचना मिळाली कि,काका जरी हे चोर असले तरीही आता आपल्या बाजूने आहेत. तर तुम्ही आता तरी त्यांचे सत्य उघड सांगू नका, लिहू नका. आता आपण फक्त युती विरोधात बोलले पाहिजे. आता आपण या चोरांना सोबत घेऊन त्या चोरांच्या विरोधात लढत आहोत. कमाल आहे? आपला तो साव आणि त्यांचा तो चोर? मला तरी हे संधी पाहून उंधी होणे आवडत नाही. राजकारण गेले चुलीत! स्वभाव माझा!
अशा आमदारांना माननिय, सन्मानिय, आदरणीय, पुजनिय तरी का म्हणावे? यांना चोर, हरामखोर, बदमाष, लुख्खे, लंफंगे असे प्राथमिक संबोधन सार्थ ठरते. कारण यांनीच सरकार ठप्प केले आहे.
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२






